मुंबई Hardik Pandya Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आज 11 ऑक्टोबर रोजी 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 31 वर्षीय पांड्या आज भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा महत्त्वाचा भाग आहे. तो डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करतो. T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हरलेला सामना जिंकवून दिला. आधी त्यानं धोकादायक दिसणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाद करुन ही भागीदारी तोडली आणि नंतर शेवटच्या षटकात 16 धावा वाचवून त्यानं 17 वर्षांनंतर भारताला T20 विश्वचषक जिंकून दिला. पांड्यानं 3 षटकांत अवघ्या 20 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले होते.
सध्या बांगलादेशविरुद्ध हार्दिक मैदानात : सध्या हार्दिक बांगलादेशसोबत खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत खेळताना दिसत आहे. ज्यात पांड्या आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात हार्दिकनं खेळलेला नो लुक शॉट आणि दुसऱ्या सामन्यात घेतलेला शानदार झेल सध्या चांगलाच चर्चेत आहे.
IPL 2024 मध्ये झाला होता ट्रोल :
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले. या संपूर्ण हंगामात हार्दिक पांड्या बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला, त्यामुळं हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. IPL च्या संपूर्ण हंगामात हार्दिकला मैदानापासून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.
T20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार पुनरागमन :
IPL 2024 चा वाईट काळ विसरुन हार्दिक पांड्यानं T20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार पुनरागमन केलं. IPL 2024 नंतर, T20 विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये हार्दिकची निवड होणार नाही, असं वाटत होतं. परंतु निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वात तेजस्वी अष्टपैलू खेळाडूवर विश्वास व्यक्त केला. हार्दिक पांड्यानंही निवडकर्त्यांच्या विश्वासावर खरा उतरला. हार्दिकनं संपूर्ण T20 विश्वचषक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोलंदाजी करत भारतीय संघाला विश्वविजेता बनवण्यात हार्दिकनं ज्या प्रकारे भूमिका बजावली ती कोणीही विसरु शकत नाही.
दोनदा लग्न करुनही सिंगल :