नवी दिल्ली Paris Paralympics 2024 : गूगलनं शुक्रवारी व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळाचं अनावरण करत महत्त्वाचे जागतिक कार्यक्रम साजरे करण्याची आणि अभिनव डूडलद्वारे सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरु ठेवली. डूडलमध्ये वापरण्यात आलेल्या प्रतिमेमध्ये पॅरालिम्पिक खेळात एक पक्षी स्लॅम डंक करताना दाखवलं आहे, असं दिसतं की पक्षानं बास्केटबॉल नेटमध्ये टाकला. गूगल नेहमीचं असे डुडल तयार करत असतो.
का सुरु करण्यात आला व्हीलचेअर बास्केटबॉल : खेळांच्या पहिल्या दिवशी यूएसए संघानं स्पेनवर 66-56 असा विजय मिळवला. स्पेनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अलाबामा पॅरालिम्पियन इग्नासिओ ओर्टेगा लाफुएन्टेनं 17 गुण मिळवून चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी व्हीलचेअर बास्केटबॉल सुरु करण्यात आला. इंटरनॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल फेडरेशनच्या मते, हा खेळ पहिल्यांदा 1945 मध्ये युनायटेड स्टेट्समधील दोन हॉस्पिटलमध्ये खेळला गेला. गूगल डूडलमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलचं चित्रण आहे आणि त्यावर क्लिक करुन वापरकर्ते सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील या खेळाचं वेळापत्रक पाहू शकतात.