शारजाह BANW vs WIW Live Streaming :ICC महिला T20 विश्वचषकाचा तेरावा सामना आज 10 ऑक्टोबर रोजी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना : T20 विश्वचषकात बांगलादेश महिला संघानं विजयानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवू इच्छितो. दुसरीकडे, वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा 2 गडी राखून पराभव झाला. अशा स्थितीत बांगलादेशचा पराभव करुन स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविण्याकडे वेस्ट इंडिजचं लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : बांगलादेश महिला आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांनी T20 मध्ये 3 वेळा खेळल्या आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला एकही विजय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत आज बांगलादेशचा संघ T20 मध्ये पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध उतरणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना गुरुवार, 10 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.