मेलबर्न Will Pucovski Retire : युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू विल पुकोव्स्कीला सक्तीनं निवृत्ती घ्यावी लागल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. ऑस्ट्रेलियासाठी फक्त एक कसोटी सामना खेळलेल्या 26 वर्षीय पुकोव्स्कीला वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार निवृत्ती घ्यावी लागली. क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिली आणि अनोखी घटना आहे. पुकोव्स्कीचं तंत्र इतकं खराब होतं की त्याच्या छोट्या कारकिर्दीत एक-दोन नव्हे तर तब्बल 13 वेळा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला.
13 वेळा डोक्याला लागला चेंडू : विल पुकोव्स्कीचे नशीब इतके खराब होते की फलंदाजी करताना 13 वेळा त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला. या वर्षी मार्चमध्ये त्याच्या हेल्मेटवर चेंडू लागून त्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्या वैद्यकीय समितीने त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. पुकोस्कीला वैद्यकीय समितीनं तीन महिन्यांपूर्वी निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. पुकोव्स्कीच्या निवृत्तीची बातमी त्याच्या सहकाऱ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट नव्हती, कारण हा फलंदाज संपूर्ण प्रशिक्षण सत्राचा भाग नव्हता.
पुढचा स्टार मानलं जात होतं : विल पुकोव्स्की हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा पुढील कसोटी स्टार म्हणून ओळखला जात होता. या खेळाडूनं अगदी लहान वयातच ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय बनवला होता. पुकोव्स्कीनं 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीनं 2350 धावा केल्या होत्या. पुकोव्स्कीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 255 होती. इतकंच नाही तर सात शतकं आणि नऊ अर्धशतकंही त्याच्या कारकिर्दीत त्यानं केली.
भारताविरुद्ध खेळला एकमेव सामना : विल पुकोव्स्कीला 2021 मध्ये सिडनी इथं भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पुकोव्स्कीनं पहिल्याच कसोटी सामन्यात 72 धावा केल्या. यानंतर त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. या कालावधीत, तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला, परंतु बाउन्सर चेंडूवर त्याचं तंत्र इतकं खराब होतं की एकूण 13 वेळा त्याच्या डोक्याला मार लागला. या कमकुवत तंत्रानं त्याची कारकीर्द उद्ध्वस्त केली.
हेही वाचा :
- 'विराट एकच आहे...' शुभमन गीलवर टीका; वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेल्या व्हिडिओचं सत्य काय? - Virat Kohli deepfake video
- ICC चेअरमन झाल्यावर जय शाहांना किती मिळणार पगार? - Jay Shah ICC Salary