सिडनी AUSW vs ENGW 1st T20I Live Streaming : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात महिला अॅशेस होत आहे. यात दोन्ही संघांमध्ये तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळला जाईल. यातील वनडे मालिका खेळली गेली आहे. जिथं ऑस्ट्रेलियन महिला संघानं इंग्लंड महिला संघाला 3-0 नं पराभूत केलं आहे. यानंतर आता तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 20 जानेवारी (रविवार) रोजी सिडनी इथं खेळवला जाईल.
वनडे मालिका विजयासह ऑस्ट्रेलिया अॅशेस जिंकण्याच्या जवळ : महिला अॅशेस विजेतेपद जिंकण्यासाठी, संघाला तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळावा लागतो. जिथं प्रत्येक वनडे आणि T20 सामना जिंकण्यासाठी 2-2 गुण दिले जातात. तर कसोटी सामना जिंकल्यानं चार गुण मिळतात. या प्रकारे एकूण गुण 16 आहेत. ऑस्ट्रेलियानं 6 गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत, जर ऑस्ट्रेलियन संघानं आगामी T20 मालिकेत एक सामना जिंकला तर त्यांना 8 गुण मिळतील. यानंतर, त्यांनी सामने हरले तरी त्यांना काही फरक पडणार नाही. ते महिला अॅशेस विजेतेपद राखेतील.
T20I मध्ये दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :T20 क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सर्वाधिक सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 23 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. आणि 7 सामने अनिर्णीत राहिले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंड महिला क्रिकेट संघाला 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये T20 सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी 21 नोव्हेंबर 2017 रोजी शेवटचा T20 सामना जिंकला होता. त्यामुळं या सामन्यात विजय मिळवत ते आपली पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न करतील.
खेळपट्टी कशी असेल :ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन महिला संघाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर फलंदाजांना खूप मदत मिळते. या मैदानावर स्लो बॉलरना अडचणी येऊ शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला उसळी मिळू शकतो. पॉवरप्लेमध्ये जलद गोलंदाज लवकर स्विंगचा फायदा घेऊ शकतात. या ट्रॅकवर प्रथम फलंदाजी करणे हा योग्य निर्णय ठरु शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात पहिला T20 सामना 20 जानेवारी (रविवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 01:45 वाजता सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी इथं खेळला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.