महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Day-Night Test: 'पिंक बॉल' कसोटीत भारताची अ'यशस्वी' सुरुवात; 'अशी' कामगिरी करणारा जैस्वाल सातवा खेळाडू - PINK BALL TEST AUS VS IND

यशस्वी जैस्वालनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 0 आणि 161 धावांची इनिंग खेळली होती. आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला आहे.

AUS vs IND Pink Ball Test
यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 6, 2024, 11:18 AM IST

ॲडलेड AUS vs IND Pink Ball Test :भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूनं खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. संघात रोहित, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विनचं ​​पुनरागमन झालं आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. शतकवीर यशस्वी जैस्वालनं शेवटच्या सामन्यात आणि पिंक बॉल कसोटीत निराशा केली तेव्हा तो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही.

पहिल्याच चेंडूवर जैस्वाल बाद : मिचेल स्टार्कनं दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. तर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल भारतासाठी सलामीला आले. स्टार्कनं सामन्याच्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू ताशी 140 किलोमीटर वेगानं जैस्वालला टाकला. लेट स्विंगमुळं जैस्वालला चेंडू नीट समजू शकला नाही आणि फ्लिक करताना तो चुकला. याच कारणामुळं तो पहिल्याच चेंडूवर LBW आउट झाला. जैस्वाल त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच गोल्डन डकवर आऊट झाला असून त्यानं अतिशय लाजिरवाणा विक्रम केला आहे.

सातवा खेळाडू : यशस्वी जैस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुनील गावस्कर, सुधीर नाईक, डब्ल्यूव्ही रमण, शिव सुंदर दास, वसीम जाफर आणि केएल राहुल कसोटीत गोल्डन डकवर बाद झाले आहेत. जैस्वालचं नाव अत्यंत वाईट यादीत समाविष्ट झालं आहे.

यशस्वी जैस्वाल तिसऱ्यांदा शून्यावर बाद :यशस्वी जैस्वालनं 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केलं. यानंतर, त्यानं भारतासाठी 16 कसोटी सामन्यांच्या 29 डावांमध्ये एकूण 1568 धावा केल्या आहेत, ज्यापैकी तो तीन वेळा शून्यावर आऊट झाला आहे. जैस्वालनं भारतासाठी आतापर्यंत चार शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत.

रोहित शर्मा मधल्या फळीत खेळणार : दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिलचं पुनरागमन निश्चित मानलं जात होतं, मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रोहितनं मोठा निर्णय घेतला असून ओपनिंगऐवजी मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

  1. फ्लॉवर नाही फायर... हॅरी ब्रूकच्या विक्रमी शतकानं वाचवली 'साहेबां'ची प्रतिष्ठा
  2. कीवी संघ पराभवाचा बदला घेणार की इंग्रज मालिका जिंकणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details