महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अफगाणिस्तान इतिहास रचणार की दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरी साधणार? दुसरा वनडे भारतात 'इथं' पाहा लाईव्ह - AFG VS SA 2nd ODI LIVE IN INDIA - AFG VS SA 2ND ODI LIVE IN INDIA

Afghanistan vs South Africa 2nd ODI Live Streaming : अफगाणिस्तान क्रिकेट संघ जागतिक क्रिकेटमध्ये सातत्यानं प्रगती करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्ताननं सर्वांना चकित केले. परिणामी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही किंमतीला विजय आवश्यक असेल, अन्यथा अफगाणिस्तान सहज इतिहास रचेल.

Afghanistan vs South Africa 2nd ODI Live
Afghanistan vs South Africa 2nd ODI Live (IANS Photos)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 20, 2024, 7:30 AM IST

शारजाह (युएई) Afghanistan vs South Africa 2nd ODI Live Streaming : अफगाणिस्तान क्रिकेट संघानं आपल्या खेळानं सर्वांना चकित केलं आणि पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. शारजाह इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाण गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना केवळ 106 धावांत गुंडाळलं. यानंतर अफगाणिस्ताननं हे लक्ष्य 26 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केलं. यासह अफगाणिस्ताननं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी : दोन्ही संघांमधील दुसरा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तान मालिका जिंकून आणखी एक मोठा अपसेट निर्माण करुन इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकलेली नाही. त्यामुळं या सामन्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. यामुळं हा सामना कुठं बघता येईल, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरु होईल.

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना टीव्हीवर कसा पाहायचा?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अली खिल, अब्दुल मलिक, रियाझ हसन, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नईब, रशीद खान, नांग्याल खरोती, अल्लाह मोहम्मद गज, फजलहक फारुकी, बिलाल सामी, नवीद झादरन आणि फरीद अहमद मलिक.
  • दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डीजॉर्ज, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुक्वायो, नकाबा पीटर, एंडिले सिमेलेन, जेसन स्मिथ, ट्रिस्‍टन स्‍टब्‍स, काइल वेरेनी आणि लिजार्ड विलियम्‍स.

हेही वाचा :

  1. IND vs BAN Test Day 1: घरच्या मैदानावर 'अण्णा'नं रचला इतिहास... 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू - R Ashwin century
  2. कधी होणार IPL 2025 चा मेगा लिलाव? समोर आली मोठी अपडेट - IPL Mega Auction Update

ABOUT THE AUTHOR

...view details