जेद्दाह Jitesh Sharma Salary Hike by 5500 Percent : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामापूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात खेळाडूंचा मेगा लिलाव सुरु आहे, ज्यात भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होताना दिसत आहे. यात एक नाव भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माचं देखील आहे, जो मागील आयपीएल हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसला होता, आता तो पुढील सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार आहे. जितेश शर्माच्या आयपीएल पगारावर नजर टाकली तर त्यात मोठी वाढ झाली आहे, जी तुम्हाला तुमच्या पगारात कधीच मिळणार नाही.
आरसीबीनं 11 कोटी रुपयांत केलं खरेदी : IPL 2025 च्या मेगा लिलावात जितेश शर्माला विकेटकीपर बॅट्समन स्लॉटमध्ये स्थान मिळालं, ज्यात त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. जेव्हा त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जनं त्याला घेण्यास स्वारस्य दाखवलं, ज्यात आरसीबीनं सुरुवातीपासूनच जितेशला घेण्याचं मन बनवलं होतं. यानंतर आरसीबीनं जितेश शर्माबाबत लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी बोलीबाजी केली होती, जी 7 कोटींवर थांबली होती. यानंतर, पंजाब किंग्ज, ज्याचा भाग जितेश होता, त्यांनी आरटीएम वापरण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीनं जितेशची किंमत थेट 11 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आणि पंजाबनं त्याला घेण्यास नकार आणि अशा प्रकारे आरसीबीनं जितेशला त्यांच्या संघाचा भाग बनविण्यात यश मिळविलं.