Most Sixes in T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2024 सुरु होण्यासाठी फक्त 4 दिवस उरलेत. या मेगा-टूर्नामेंटमध्ये भारतीय चाहत्यांना विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माकडून धावांची अपेक्षा असेल. पण त्याआधी आज आम्ही तुम्हाला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत. या फलंदाजांमध्ये भारताच्या 2 फलंदाजांच्या नावांचा समावेश आहे.
टॉप 8 मध्ये विराट कोहलीचा समावेश : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आठव्या क्रमांकावर आहे. त्यानं 27 सामन्यांच्या 25 डावात एकूण 28 षटकार मारलेत. आता टी-20 विश्वचषक 2024 मध्ये विराटला आपली आकडेवारी सुधारण्याची आणि सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवण्याची संधी असेल.
शेन वॉटसन :ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 24 सामन्यांच्या 22 डावात 31 षटकार मारले आहेत.
युवराज सिंग : भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. युवराजनं 31 सामन्यांच्या 28 डावात एकूण 33 षटकार मारले आहेत. टी-20 विश्वचषकात 6 चेंडूत 6 षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे.
जोस बटलर :इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलर टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात बटलरनं आतापर्यंत 27 सामन्यांच्या 27 डावांमध्ये एकूण 33 षटकार मारले आहेत.