- मेष: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारास त्यांच्या कामात मदत करावी लागेल. आपणास आपल्या व्यापाराकडं लक्ष देण्याची गरज आहे. प्रणयी जीवनात जिव्हाळा असल्याचं दिसून येईल. या आठवड्यात आर्थिक बाबींमुळं होणारी चिंता आपल्यासाठी डोकेदुखीचं कारण होऊ शकते. आपले नशीब बलवान असल्यानं आपल्या आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधारणा होत असल्याचं दिसून येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या भागीदारावर लक्ष ठेवावं लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन नोकरीचा विचार करतील. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणात घवघवीत यश मिळू शकते. आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. प्रकृतीत विशेष सुधारणा होणार नाही. रोजच्या दिनचर्येत काही बदल करावा लागेल.
- वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रणयी जीवनात गैरसमजुतीमुळं कटुता निर्माण झाल्याचं दिसेल. वैवाहिक जीवनात सुद्धा विशेष काही होताना दिसत नाही. या आठवड्यात आपले खर्च वाढतील. जर आपले एखादे कायदेशीर काम खोळंबले असेल तर पैसे देऊन आपण ते पूर्ण करू शकता. आपण जर नवीन वाहन खरेदी केलेत तर त्यात सुद्धा आपला खर्च जास्त होईल. शैक्षणिक क्षेत्रात हळू- हळू यश प्राप्त होईल, परंतु आपलं मन अभ्यासात रमणार नाही. त्यामुळं अनुकूल परिणाम मिळू शकणार नाही. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीत चढ-उतार होताना दिसतील. अशा परिस्थितीत एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. आपण घर सजावट आणि दुरुस्ती यासाठी सुद्धा पैसा खर्च कराल. नोकरीत पदोन्नती होता- होता स्थगित होऊ शकते. व्यापार वृद्धीची संधी मिळेल.
- मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. प्रणयी जीवनात काही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. पैसा सुद्धा जास्त खर्च होईल. प्रकृतीत होणारे चढ-उतार आपणास त्रस्त करतील. आपण एखादे नवीन घर सुद्धा खरेदी करू शकाल. व्यापार वृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सध्याच्या नोकरीतच टिकून राहणं उपयुक्त ठरेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळावं लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. मांगलिक कार्यक्रमाचं आयोजन होईल. या आठवड्यात आपणास प्रवासाची संधी सुद्धा मिळेल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. गुरुजनांचे सहकार्य मिळेल.
- कर्क: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख- शांती नांदेल. आपण कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत असल्याचं दिसून येईल. वैवाहिक जीवनात जिव्हाळा असल्याचं दिसेल. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण जर या पूर्वीच एखादी गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा आपणास पूर्ण फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांच्या परदेशात सुद्धा नवीन ओळखी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल, परंतु आपण आपला थोडा वेळ मित्रांच्या सहवासात आणि सामाजिक माध्यमात सुद्धा घालवाल. असं झाल्यानं अभ्यासात आपले थोडे नुकसान होईल.
- सिंह : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवत असल्याचं दिसून येईल. जोडीदारास काही नवीन उपलब्धी प्राप्त झाल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रणयी जीवन काही खास नसेल. आपण जर पूर्वी एखादी गुंतवणूक केली असेल तर त्यातून आपणास पूर्ण लाभ मिळेल. आपण जर कोणाला पैसे उसने दिलेत तर ती व्यक्ती आपणास वेळेवर पैसे परत करेल. आपण जर जमीन किंवा घर खरेदी करत असाल तर त्या संबंधी असलेले कागदपत्र नीट तपासून बघावेत. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना अधिक मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील आणि त्यामुळं ते आपल्या व्यापाराची व्याप्ती वाढविण्यात यशस्वी होतील.
- कन्या: हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. प्रणयी जीवनातील माधुर्य टिकून राहील. आपण आपल्या प्रेमिकेची भेट सुद्धा आपल्या कुटुंबियांशी घडवून आणाल. आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास सुद्धा कराल. त्यामुळं सर्वजण खुश झाल्याचं दिसून येईल. हा आठवडा आपल्यासाठी खर्चाचा आहे. आपणास जर एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. आपण जर एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात आपणास जास्त मेहनत करावी लागेल. व्यवसाय वृद्धी करण्यात व्यापारी यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. अविवाहितांसाठी चांगले प्रस्ताव येतील.
- तूळ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. प्रणयी जीवन सुखावह झाले तरी या आठवड्यात आपले मन काहीसे बेचैन राहील. आपण कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ असाल. गैरसमजुतीमुळं नात्यात काही समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. शेअर बाजारात गुतंवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणं आपल्या हिताचं होईल. आपण जमीन किंवा वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा खर्च कराल. हा खर्च आपल्या हिताचा असेल. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सकाळचं फिरणं, योगासन आणि ध्यान - धारणेस आपल्या दिनचर्यात समाविष्ट करावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीत बदल करतील, जो त्यांच्या हिताचा असेल. व्यापारी नवीन काही करण्याचा विचार करतील.
- वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात आपण प्रेमाचे काही क्षण घालवू शकाल. जोडीदाराच्या प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसेल. त्यामुळं आपले खर्च सुद्धा वाढतील. कोणत्याही प्रकारच्या व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण त्यात यशस्वी व्हाल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण जर कोणाला कर्ज देऊ इच्छित असाल तर आपण ते देऊ शकता. कौटुंबिक खर्चात सुद्धा वाढ होईल. व्यापारी जर एखाद्या नवीन प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करत असले तर त्यात त्यांचा फायदाच होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात अतिरिक्त मेहनत करावी लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.
- धनु : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. आपल्या प्रकृतीत होणारे चढ-उतार आपणास अत्यंत त्रस्त करतील. शैक्षणिक क्षेत्रात मेहनत केल्यास यश प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांनी एखाद्या नवीन प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली तर त्यांना मोठा लाभ प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करावा लागेल, तेच त्यांच्या हिताचे होईल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदारासह सुखद क्षण घालवाल. प्रणयी जीवनात थोडासा लटका राग असलेला दिसेल. आपण जमीन आणि नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे खर्च कराल. या आठवड्यात आपण खर्च करण्यापूर्वी बराच विचार करत बसाल आणि त्यामुळं आपली अनेक कामे खोळंबतील. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
- मकर : हा आठवड्यात आपले प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. वैवाहिक जीवन अधिक सुखावह व्हावं म्हणून एकांतात राहण्यासाठी वेळ काढा. ज्यामुळं आपल्या नात्यात प्रेम वृद्धिंगत होईल. प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या आगमनानं त्रास होऊ शकतो. आपण आपले नाते टिकविण्यासाठी अत्यंत सावध पाऊले उचलावीत. एकत्र बसून सर्व काही शांतपणे ऐकलेत आणि बोललात तर हितावह होईल.
- कुंभ :हा आठवडा आपणास खुश करणारा आहे. प्रकृतीमुळं आपण कदाचित काहीसे त्रस्त असल्याचं दिसेल. अशा परिस्थितीत एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हितावह होईल. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास न केल्यास त्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकणार नाही. आपण आपला पैसा घर, प्रॉपर्टी, दुकान, जमीन इत्यादींची खरेदी करण्यात खर्च करू शकता. त्याचा आपणास भविष्यात खूप चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात वाद - विवाद होत असल्याचं दिसेल. प्रणयी जीवनात कटुता दिसेल. आपण घराच्या सजावटीसाठी आणि दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च कराल. शेअर बाजारासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त मेहनत करावी लागेल. आपण जर प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर आपणास त्यात लाभ होईल. विद्यार्थी नवीन विषय शिकून अत्यंत खुश झाल्याचं दिसून येईल. त्यांना गुरुजनांचं सहकार्य मिळेल.
- मीन: हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. प्रकृतीमुळं आपण उर्जावान झाल्याचं आपणास जाणवेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसेल. परंतु, त्यांना त्यात काही समस्यांना सामोरे जावं लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सध्याची नोकरी टिकविणं हिताचे होईल. येणाऱ्या काळात त्यांना चांगली संधी प्राप्त होईल. व्यापार करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रलंबित योजना पुन्हा सुरु करण्यात यशस्वी होतील. यश प्राप्त होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी सुरु होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराशी असलेली कटुता दूर होईल. प्रणयी जीवनात वाद - विवाद होतील. या आठवड्यात आपणास निष्कारण खर्च करावे लागतील. त्यासाठी आपणास आपल्या बचतीवर लक्ष ठेवावं लागेल. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा खूप खर्च होईल.