मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपलं आरोग्य उत्तम राहिलं तरी ऋतू बदलामुळं होणाऱ्या विकारानं आपण त्रस्त होऊ शकता. आपणास जर जमीन-जुमल्यात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर आठवड्याच्या अखेरीस तसं करू शकता. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात कोणत्याही प्रकारचे बदल न करणं हिताचं ठरेल. प्रेमीजनांनी प्रेमिकेशी संवाद साधताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. अन्यथा भांडण होऊ शकतं. वैवाहिक जीवनात वाद वाढण्याची संभावना आहे. जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ (Taurus) :याआठवड्यात आपलं आरोग्य उत्तम राहील. आपल्या सर्व समस्या दूर होतील. आपणास जर अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्तरांचा सल्ला घ्यावा. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारास पुढे नेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. ज्यांना आपल्या नोकरीत बदल करावयाचा आहे, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास जर एखादे वाहन खरेदी करायचे असेल किंवा घराचं नूतनीकरण करायचं असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपले खर्च वाढू शकतात. तसेच एखाद्या गोष्टीमुळं आपल्या प्रेमिकेशी आपला वाद होण्याची संभावना आहे. दांपत्य जीवनात सुद्धा वाद संभवतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
मिथुन (Gemini) :हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपले जुने विकार उफाळून येण्याची संभावना आहे. त्याचा आपणास खूप त्रास होऊ शकतो. तसेच आपल्या स्वतःसाठी आणि घरात काही सामान खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च होऊ शकतो. आपला व्यवसाय उत्तम चालेल. आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी आपणास जास्त परिश्रम करावे लागतील. ज्यांना आपली नोकरी बदलावयाची आहे त्यांना ह्या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते. आपला जर प्रेमभंग झाला असेल तर आपली प्रेमिका आपल्याकडं परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण अधिक प्रसन्न व्हाल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. आपण जर एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकता.
कर्क (Cancer) : हा आठवडा आपणास चांगला आहे. आपणास नेत्र विकार त्रस्त करण्याची संभावना आहे. त्याकडं आपण दुर्लक्ष करू नये. व्यापाऱ्यांना सट्टा बाजारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. असं असलं तरी नोकरीत किंवा व्यापारात कोणत्याही प्रकारे घमंड व्यक्त करू नका. आपणास जर कर्ज घ्यावयाचं असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास सहजपणे कर्ज मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि ज्ञान प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. त्यांचा बहुतांश वेळ मित्रांशी गप्पा मारण्यात जाण्याची संभावना असून त्यांनी तो टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जोडीदाराच्या सहवासात घालविण्याचा प्रयत्न करावा.
सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपण जर अनेक दिवसांपासून आजारी असाल तर निष्काळजीमुळं आपला आजार बळावण्याची संभावना आहे. त्यामुळं आपण त्रस्त होऊ शकाल. हा आठवडा व्यावसायिकांसाठी चांगला आहे. नवीन व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. परंतु त्यांनी कोणाशी वाद घालणं टाळावं. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. अन्यथा शेवटच्या क्षणी त्रास होऊ शकतो. आपल्यापासून दुरावलेली प्रेमिका आपल्याकडं परत येऊ शकते. आपल्या वाणीच्या प्रभावाने वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपण जर एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर ह्या आठवड्यात त्यात हळू हळू उतार येऊ शकतो. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारात आजवर जी काही मेहनत केली आहे त्याचा लाभ त्यांना ह्या आठवड्यात होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपणास जर नोकरी बदलायाची असेल तर त्यासाठी आपणास चांगली संधी मिळू शकते. आपली आर्थिक स्थिती सामान्य राहील. हा आठवडा आर्थिक देवाण-घेवाण करण्यास अनुकूल नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा उत्तम आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी विवाह बंधनात अडकू शकता. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपणास आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यापारी एखादा नवीन सौदा करू शकतील. ते आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी होऊ शकतील.
तूळ (Libra): हा आठवडा आपणास ठीक आहे. आपल्यात ऊर्जा असली तरी एखाद्या आजारानं आपण काहीसे त्रस्त होऊ शकता. परंतु आपण वेळ काढून त्याचा सामना केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करणार नाही. आपणास त्या आजारावर योग्य उपाय सुद्धा सापडू शकेल. आपलं शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून सकाळचं चालणं आणि योगासन ह्यांना आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे. ह्या आठवड्यात काही फुटकळ कामात आपण जास्त पैसा खर्च कराल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये, अन्यथा नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी चालूच ठेवावी. नोकरीत बदल केल्यास त्रास होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह फिरायला जाऊ शकाल. वैवाहिक जीवनात काही गैरसमजांमुळं त्रास होऊ शकतो.