महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

या आठवड्यात अनेक शुभ योग; 'या' राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 5:21 PM IST

  • मेष (ARIES): हा आठवडा आपणास शुभ संकेत देणारा आहे. आठवड्याच्या सुरूवातीसच आपणास अचानकपणे कोठून तरी मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. कारकीर्द-व्यवसाय यांच्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. महिलांची धर्माप्रती रुची वाढेल. व्यवसायात आशास्पद प्रगती होत असल्याचं दिसले तरी आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं. इतरांवर डोळेझाक विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखाद्या मंगल किंवा धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. प्रेमिकेशी प्रेम आणि सामंजस्य वाढेल. दांपत्य जीवन सुखद होईल. आरोग्याच्या दृष्टीनं हा आठवडा सामान्यच आहे. मुलांशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याने मनास दिलासा मिळेल.
  • वृषभ (TAURUS) : हा आठवड्यात जीवनाशी संबंधित कोणतेही पाऊल विचारपूर्वकच उचलावे लागेल, अन्यथा निष्कारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपणास आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि परिश्रम करावेच लागतील. आठवड्याच्या सुरूवातीस कामाचा भार जास्तच राहील. विशेष म्हणजे आपल्या व्यस्त कार्यक्रमात मित्रांचं सहकार्य सुद्धा कमीच मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवड्याची सुरूवात जरी चांगली झाली नाही तरी आठवड्याच्या अखेरीस मिळणारा लाभ त्यांच्या आनंदास कारणीभूत ठरेल. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद आपल्या चिंतेस कारणीभूत ठरेल. प्रणयी जीवनातील कोणतेही गैरसमज संवादानं दूर करण्याचा प्रयत्न करावा. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
  • मिथुन (GEMINI) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यात जरी अडचणी आल्या तरी उत्तरार्धात कामे आपल्या मनाप्रमाणे होत असल्याचं दिसून येईल. आठवड्याच्या सुरूवातीस कारकीर्द-व्यवसायासाठी दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. ह्या दरम्यान ऋतुजन्य विकाराप्रति सतर्क राहावं. आपली दिनचर्या आणि आहारावर लक्ष ठेवावे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. आपल्या परिसराच्या बाहेर काम करणाऱ्या आणि कमिशनवर काम करणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव आणि बेचैनी जाणवेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आठवड्याच्या अखेरीस प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या पूर्वार्धा पेक्षा उत्तरार्ध सौख्य आणि यश देणारा होईल. ह्या दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं एखाद्या मोठ्या समस्येचं निराकरण झाल्यानं मन प्रसन्न होईल.
  • कर्क (CANCER) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस होऊ घातलेल्या कामात अडथळे आल्यानं मन खिन्न होईल. शरीरास दुखापत होण्याची संभावना असल्यानं वाहन सावकाश चालवावे. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या आजिविकेचे साधन अडचणीत येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांशी मोठी टक्कर द्यावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास कामात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यक्षेत्र व कुटुंब ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास थोडा वेळ अवश्य द्यावा. प्रणयी जीवनास हा आठवडा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात आपल्या प्रेम संबंधाचे प्रदर्शन करणं किंवा ते जग जाहीर करणं टाळावं. कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावं, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • सिंह (LEO) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठ्वड्याची सुरूवात खूपच चांगली आहे. ह्या दरम्यान आपली पदोन्नती किंवा पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी संपर्क वाढतील. आपण जर अनेक दिवसांपासून जमीन-घर यांच्या खरेदी-विक्रीची योजना आखली असेल तर ह्या आठवड्यात आपली ही मनोकामना पूर्ण होऊ शकते. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळून संचित धन वृद्धिंगत होईल. राजकारणातील व्यक्तींना उच्च पद मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल, ज्याच्या मदतीनं धन लाभ आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रकृती सामान्यच राहील. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळं आपलं मन काहीसे चिंतीत होऊ शकते. प्रेमसंबंध प्रगल्ल्भ होतील. प्रेमाचं रूपांतर विवाहात होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.
  • कन्या(VIRGO): हा आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावं लागेल. या आठवड्यात कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नये. अशावेळी एखाद्या शुभचिंतकाच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा किंवा निर्णय घेणं पुढे ढकलावे. आठवड्याच्या उत्तरार्धात प्राप्ती कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं आपली आर्थिक घडी विस्कटू शकते. ह्या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नाजूक होऊ शकते. ऋतुजन्य किंवा जुने विकार उफाळून आल्यानं आपण त्रस्त होऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावं लागेल. आपल्या अडचणीच्या वेळी आपली प्रेमिका मदतीस धावून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
  • तूळ (LIBRA): हा आठवडा आपल्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस सुख-सोयींशी संबंधित वस्तूंच्या खरेदीमुळं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपण जर अनेक दिवसांपासून आपल्या बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर ह्या आठवड्यात आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते. प्राप्तीची साधने वाढली तरी आपले खर्च सुद्धा वाढतील. व्यवसायात अनपेक्षितपणे मिळालेला लाभ आपला आनंद वाढवेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या मित्रांच्या मदतीनं एखादे मोठे कार्य पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रणयी जीवनात प्रेमिकेशी जवळीक वाढेल. कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहास मान्यता देऊ शकतात. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात हसत - खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान जोडीदाराचे एखादे यश आपल्या व कुटुंबियांच्या आनंदास कारणीभूत ठरेल.
  • वृश्चिक (SCORPIO): ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीमुळं स्वजनांशी मतभेद होण्याची संभावना आहे. बोलताना वाणी आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवावं, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या पूर्वार्धा पेक्षा उत्तरार्ध काहीसा दिलासा देणारा असू शकतो. एखाद्या मित्राच्या मदतीनं नवीन कार्याची योजना आखाल. परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. प्रणयी जीवनात भावनेच्या आहारी जाऊन एखादा मोठा निर्णय घेणे टाळा. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान आपणास ऋतुजन्य विकारांचा त्रास होऊ शकतो. विनाकारण होणारी धावपळ आणि खर्च यामुळं आपलं मन काहीसे खिन्न होईल. कार्यक्षेत्री आपले विरोधक आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
  • धनु (SAGITTARIUS) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपले लक्ष्यांक गाठण्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. कितीही कठीण परिस्थिती असली तरी प्राप्तीची साधने मात्र टिकून राहतील. सरकार-दरबारी प्रलंबित असलेल्या कामांना गती येईल. ह्या दरम्यान धार्मिक-सामाजिक प्रवृत्तीत आपला सहभाग वाढेल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या गोष्टीने कुटुंबियांशी मतभेद संभवतात. ह्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होणार नाही याची दक्षता घ्यावी. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या मदतीनं एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. लटकी भांडणे झाली तरी आपले प्रेम संबंध दृढ होतीलच, शिवाय आपल्या कठीण समयी आपली प्रेमिका हेच आपले शक्तीस्थान असेल.
  • मकर(CAPRICORN): आठवड्याच्या सुरूवातीस आपणास धनलाभास आणि उन्नतीस अनुकूल संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यास एखाद्या महिला मित्राच्या मदतीनं आपली एखादी मोठी चिंता दूर होईल. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्त होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. अविवाहितांच्या जीवनात एखाद्या व्यक्तीचा प्रवेश संभवतो. नुकतीच एखाद्या व्यक्तीशी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं मन काहीसे चिंतीत होऊ शकते. असं असलं तरी आपणास सुद्धा स्वतःच्या प्रकृतीची आणि आहाराची काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कौटुंबिक वातावरण सुखद होईल. ह्या दरम्यान रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरात एखादे शुभ कार्य होण्याची संभावना आहे.
  • कुंभ (AQUARIUS) : आठवड्याची सुरूवात काहीशी त्रासदायी असू शकते, परंतु दिलासाजनक बाब हि आहे की ह्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मित्रांचे आणि स्वजनांचे भरपूर सहकार्य आपणास मिळेल. आठवड्याच्या सुरूवातीस कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने सरकार - दरबारी प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अर्थात हि कठीण परिस्थिती फार काळ टिकणार नाही. उत्तरार्धात आपली स्थिती अनुकूल होत असल्याचं दिसून येईल. आठवड्याच्या अखेरीस सुख-सुविधेशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसा खर्च करावा लागेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेशी संबंधित एखाद्या मोठ्या यशाने मन प्रसन्न होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या योजनेतील आर्थिक गुंतवणूक मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल. बाजारात आलेल्या तेजीचा लाभ घेण्यात व्यापाऱ्यांना यश प्राप्त होईल. बाजारात त्यांची प्रतिष्ठा उंचावेल.
  • मीन (PISCES) : हा आठवडा आपणास शुभदायी आणि लाभदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या कारकिर्दीत आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होत असल्याचं आपणास दिसून येईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यानं आपण आपले लक्ष्यांक वेळे पूर्वी गाठण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या अखेरपर्यंत पत्नी किंवा मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यानं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास धनवृद्धी आणि व्यवसायवृद्धी करण्यास कारणीभूत ठरतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त धनप्राप्तीचे स्रोत मिळतील. संचित धनात वाढ होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्रा व्यतिरिक्त कुटुंबात सुद्धा त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रकृती सामान्यच राहील. कुटुंबात एखादे मंगलकार्य संपन्न होऊ शकते.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details