महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

12 राशींसाठी कसा राहील नवीन आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope: कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope 2024
साप्ताहिक राशीभविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 1:58 PM IST

मेष (Aries) :हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी एखाद्या गोष्टीने वाद होऊ शकतो. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात आपणास डोळसपणे कामे करावी लागतील, अन्यथा आपणास आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा विशेष शुभ फलदायी आणि यशस्वीदायी होईल असे दिसत नाही. ह्या आठवड्यात प्रेमिकेची भेट होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळं आपलं मन बेचैन राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. अर्थात आपल्यासाठी अडचणीचे दिवस फारकाळ टिकणार नाहीत. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण आपल्या विवेकाच्या जोरावर आणि मित्रांच्या मदतीनं जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपणास सामान्य आणि लाभदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सिद्धतेमुळं आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. धार्मिक कार्य संपन्न होतील. पूर्वी एखाद्या योजनेत किंवा व्यापारात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आपणास ह्या आठवड्यात लाभ मिळण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा निर्णय घेऊ शकता. युवकांचा वेळ मौज - मजा करण्यात जाईल. संगीता प्रती रुची वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. प्रेम संबंध दृढ आणि प्रगल्भ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्याना एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. आठवड्याच्या अखेर पर्यंत जमीन- घर ह्याच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आपले स्वप्न साकार होईल. पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे. आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini) : ह्या आठवड्याच्या पूर्वार्धाहून उत्तरार्ध जास्त सकारात्मक होणार आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्यावर कार्यालयाशी संबंधित कामाचा अतिरिक्त भार येण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात प्रवासा दरम्यान आपल्या प्रकृतीची आणि सामानाची काळजी घ्यावी. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रभावित व्यक्तीच्या मदतीनं दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळवू शकाल. प्रणयी जीवन प्रगल्भ होईल. प्रेमिके प्रती आकर्षण वाढल्यानं आपणास जास्तीत जास्त वेळ तिच्या सहवासात घालविण्याची इच्छा होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. ह्या आठवड्यात मित्रांसह किंवा कुटुंबियांसह एखाद्या रमणीय ठिकाणाची सहल संभवते. एखादी तीर्थयात्रा सुद्धा संभवते. दान - धर्म करण्यात आपले मन रमेल.

कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या दरम्यान लोकांशी मिळून-मिसळून काम केल्यानं लाभ होईल. तसेच आपली इच्छित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यापारात निव्वळ लाभच होणार नाही तर त्याची वृद्धी सुद्धा होईल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी विशेष अनुकूल नाही. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी झालेले मतभेद आपल्या तणावास कारणीभूत ठरेल. गैरसमज दूर करताना आपल्या वागण्यात नम्रता ठेवावी, अन्यथा होऊ घातलेली जवळीक दुराव्यात परिवर्तित होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं आपलं मन चिंतीत होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मंगल किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्याना एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. अपेक्षित यश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहात वृद्धी होईल.

सिंह (Leo) :लहान-सहान समस्या वगळल्यास हा आठवडा आपल्यासाठी लाभदायी होईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या कौटुंबिक समस्येचं निराकरण झाल्यानं आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. विद्यार्थी अभ्यासात रमतील. ते पूर्ण मन लावून आपल्या ध्येय पूर्तीची तयारी करत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. हा प्रवास सुखद व लाभदायी होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. आपल्या प्रेम संबंधास मान्यता देऊन कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्का मोर्तब सुद्धा करू शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. ह्या दरम्यान नवीन आणि मोठी जवाबदारी मिळाल्यानं घर व कार्यक्षेत्र ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. ह्या दरम्यान हास्य-विनोद करताना कोणाचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या (Virgo) :हा आठवडा आपणास अत्यंत शुभ फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास आपल्या कार्यक्षेत्राशी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. ह्या दरम्यान आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं. ह्या दरम्यान घराची दुरुस्ती किंवा सुख-सोयींशी संबंधित वस्तू खरेदी करण्यात खिशातून जास्त पैसा खर्च झाल्यानं आपलं अंदाजपत्र कोलमडू शकतं. ह्या दरम्यान एखाद्या योजनेत पैसे गुंतविण्यापूर्वी आपल्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. प्रेमिकेच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची भरपूर संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रकृती सामान्यच राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास आपल्या कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. असे केल्याने आपण आपली कामे वेळेवर योग्य रीतीनं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी लाभदायी व उन्नतीदायक आहे. आठवड्याच्या सुरूवातीसच कार्यक्षेत्री वरिष्ठांकडून मिळालेली शाबासकी आणि कनिष्ठांचे सहकार्य आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा विचार करत असाल तर जरूर तसं करा, आपणास होकार मिळेल. जे आधीपासून प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. एकमेकांप्रती विश्वास निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराशी संबंधातील माधुर्य टिकून राहील. त्यामुळं आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या अखेर पर्यंत एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. कार्यक्षेत्री आपल्या कामगिरीचे गुणगान व योजनेचा खुलासा इतरांसमोर करणे टाळा, अन्यथा आपणास दृष्ट लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना आई - वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक (Scorpio) :हा आठवडा आपल्यासाठी काहीसा चढ-उतारांचा आहे. ह्या दरम्यान आपण कोणी केलेल्या टीका-टिप्पणी ऐवजी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. त्याचबरोबर निव्वळ कार्यक्षेत्रीच नव्हे तर खाजगी जीवनात सुद्धा गुप्त शत्रुं पासून सावध राहावं. ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीने आपल्या प्रेमिकेशी वाद-विवाद होऊ शकतात. ज्यातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या स्त्री मित्राची खूप मदत होईल. आपले प्रेम संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबियांच्या सहवासात एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. प्रवास सुखद व मनोरंजक होईल. ह्या आठवड्यात सुख-सोयींशी संबंधित वस्तूंवर भरपूर पैसा सुद्धा खर्च करू शकता.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्यावर एखाद्या मोठ्या जवाबदारीचा भार पडू शकतो. ती पार पाडण्यास आपल्याला अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. व्यवसाया निमित्त ह्या आठवड्यात केलेले प्रवास लाभदायी होतील. प्रवासात एखाद्या प्रभावी व्यक्तीची ओळख होईल. ह्या ओळखीमुळे भविष्यात लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्यच आहे. प्रेमिके वरील प्रेम व विश्वास टिकून राहील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास आपल्या जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण होत असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान सुद्धा आपणास कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलून वाटचाल करावी लागेल.

मकर (Capricorn) : ह्या आठवड्यात आपल्यावर ईश्वराची पूर्ण कृपा होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबाशी संबंधित समस्यांचे निराकरण झाल्याने आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. ह्या दरम्यान आपण जर आपल्या कार्यक्षेत्री सहकाऱ्यांशी समन्वय साधून कामे केली तर आपली कामे आपण सहजपणे वेळेवर पूर्ण करू शकाल. असे असले तरी कोणताही महत्वाचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. प्रणयी जीवनासाठी आठवडा शुभ फलदायी आहे. प्रेमिकेशी उत्तम समन्वय असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. परीक्षेची - स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाया निमित्त केलेला प्रवास सुखद व लाभदायी होईल. आई - वडीलां कडून आपणास पूर्ण सहकार्य मिळेल.

कुंभ (Aquarius) :ह्या आठवड्यात आपणास आपली वाणी व व्यवहार ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री आपले वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघांना घेऊन वाटचाल करावी. आठवड्याच्या मध्यास कामा निमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने त्रासदायी असू शकतो. ह्या दरम्यान ऋतुजन्य विकारांपासून सतर्क राहावे. तसेच प्रकृती विषयक कोणत्याही लहान - सहान तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आपणास रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. ह्या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीनं जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपसातील विश्वास वाढेल. आपल्या कठीण प्रसंगात वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी उभा राहील. आठवड्याचा उत्तरार्ध परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व संशीधन कार्यात गुंतलेल्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी आहे. एखादी मोठी खुशखबर मिळाल्यानं मन प्रसन्न होईल.

मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून आपले नवीन काम सुरु करण्याच्या विचारात आहेत, त्यांना एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून तो सुरु करण्यासाठी मोठे सहकार्य मिळू शकते. जे आधी पासूनच एखादा व्यवसाय करत आहेत त्यांना अपेक्षित लाभ मिळेल. घर-जमीन यांच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊन लाभ प्राप्ती होईल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात व्यतीत होईल. प्रणयी जीवनात येणारे अडथळे दूर होऊन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात कुटुंबियांसह आपण एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीस सुद्धा जाऊ शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात मित्रांच्या माध्यमातून लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील.

हेही वाचा -

'दीप अमावस्या' 2024; पितरांच्या शांतीसाठी लावा कणकेचा एक दिवा - Deep Amavasya 2024
यंदा किती श्रावण सोमवार असणार? पहिल्या सोमवारी वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024

ABOUT THE AUTHOR

...view details