महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

गौराई घेणार पाहुणचार; 'अशी' आहे गौरीपूजनाची प्रथा, तर गौरी विसर्जनासाठी 'हा' आहे शुभ मुहूर्त - Mahalaxmi Gauri Pujan 2024 - MAHALAXMI GAURI PUJAN 2024

Mahalaxmi Gauri Pujan 2024 : गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालं असताना, महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये मंगळवारी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीची पूजा विविध प्रकारे केली जाते. तर काय आहे गौरी पूजनाचा आणि गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Jyeshtha Gauri Pujan) जाणून घेऊयात.

Mahalaxmi Gauri Pujan 2024
गौरी पूजन आणि विसर्जन (Etv Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 7:23 PM IST

Updated : Sep 10, 2024, 10:30 PM IST

Mahalaxmi Gauri Pujan 2024: ज्येष्ठा गौरीला 'महालक्ष्मी' असं सुद्धा (Vidarbha Mahalaxmi) म्हणतात. ज्येष्ठा गौरी ही साक्षात पार्वतीचं स्वरूप असल्याची मान्यता आहे. ज्येष्ठा गौरीच्या या तीन दिवसात स्वतः पार्वती माता माहेरपणाला येतात. यामुळंच माहेरवाशीणीच्या आवडीचे गोडधोड पदार्थ ज्येष्ठा गौरीचं आगमन होताच सलग तीन दिवस बनविले जातात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan) आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन असं हे तीन दिवसांचं व्रत आहे.

ज्येष्ठा गौरी पूजा मुहूर्त (Gauri Pujan) : बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन केलं जाणार आहे. ज्येष्ठ नक्षत्र रात्री 09 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच दुपारी 12 वाजेपासून ते 02 वाजून 04 मिनिटांपर्यंत राहूकाळ आहे. त्यामुळं राहूकाळ सोडला तर सकाळपासून ते रात्री 09 वाजून 20 मिनिटांपर्यंत गौरी पूजन करता येणार आहे.

गौरी विसर्ज मुहूर्त (Gauri Visarjan) : गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केलं जाणार आहे. मूळ नक्षत्र रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे.

गौरीपूजनाची विदर्भातील प्रथा : विदर्भात ज्येष्ठा गौरीचं आगमन आणि पूजनाची एक विशिष्ठ पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीला सोळा भाज्या आणि सोळा चटण्यांचा विशेष असा नैवेद्य अर्पण केला जातो. यासह ज्येष्ठा गौरी पूजनाला आंबीलच्या नैवेद्याला महत्त्व आहे.आंबील ही ज्वारीपासून तयार केली जाते.


नैवेद्यामध्ये 16 भाज्या आणि चटण्यांना मान :ज्येष्ठा गौरीला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये आंबील इतकाच सोळा भाज्या आणि चटण्यांना मान आहे. ताकात बेसन भिजवून तयार केल्या जाणाऱ्या कथलीचं सुद्धा महत्त्व आहे. लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या टाकूनही कथली तयार केली जाते. यासोबतच एकूण सोळा प्रकारच्या विविध भाज्या नैवेद्यात असतात. यामध्ये काशीफळ अर्थात कोहळ्याच्या भाजीला सर्वाधिक महत्त्व आहे. या भाज्यांसोबतच तीळ, चणाडाळ, जवस, शेंगदाणा, मूग, हिरवी मिरची कोथिंबीर, काकडी, गाजर, करडई अशा सोळा प्रकारच्या विविध चटण्याही नैवेद्यात असतात.


नैवेद्यात असतात 16 पुरणपोळ्या :ज्येष्ठा गौरीच्या नैवेद्यामध्ये पुरणाच्या 16 पोळ्यांना मान आहे. पुरणाचे मोदक देखील नैवेद्यामध्ये ठेवले जातात. यासोबतच आळुच्या वड्या, मुगाचे वडे, भजी यांना सुद्धा अतिशय मान आहे. लाडू, करंजी, अनारसे, पापड्या यांचा फुलोरा ज्येष्ठा गौरीला अर्पण केला जातो.


पूजनानंतर दार करतात बंद :सायंकाळी ज्येष्ठा गौरीची आरती झाल्यावर, काही वेळेसाठी ज्येष्ठा गौरी ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे, त्या ठिकाणचे दार दहा ते पंधरा मिनिटांसाठी बंद केली जातात. ज्येष्ठा गौरी त्यांच्यासमोर ठेवलेले नैवेद्य ग्रहण करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळं यावेळी त्यांना पाहू नये, म्हणून काही वेळ दार बंद करण्याची प्रथा आहे.

हेही वाचा -

'या' शुभ मुहूर्तावर गौराई येणार माहेरी; जाणून घ्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरीची कथा - Jyeshtha Gauri Avahana 2024

Last Updated : Sep 10, 2024, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details