मेष :हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात जरी सुख - शांती असली तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळं जीवन तणावयुक्त असल्याचं दिसून येईल. प्रणयी जीवनात सुद्धा चढ - उतार असल्याचं दिसून येईल. ज्यांना एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शेअर बाजारात मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. अति आत्मविश्वास टाळावा. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतील. आपण आपल्या व्यस्त जीवनातून सुद्धा कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल, त्यामुळं आपण त्यांच्याशी सुख - दुःखाच्या गोष्टी करताना दिसून येईल. स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल. खरेदी करताना मात्र आपणास अंदाजपत्र बनवावे लागेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. सर्वजण एकत्रितपणे कामे करत असल्याचं दिसून येईल. भावाच्या विवाहावर शिक्कामोर्तब झाल्यानं कुटुंबात मंगल कार्याचं आयोजन होईल. सर्वांची ये-जा चालू होईल. प्रणयी जीवनात काही कारणाने तणाव असल्याचं दिसून येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. स्पर्धेत यश प्राप्ती होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन कामा निमित्त प्रवास सुद्धा करावं लागतील. व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होता येईल. प्रकृतीत हळू - हळू सुधारणा होईल. प्रकृतीत जर चढ - उतार होत असले तर एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जोडीदारासह आपण काही सुखद क्षण व्यतीत करताना दिसून येईल. मुलांचे सहकार्य मिळेल.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी येण्याची संभावना असून आपण त्याने काहीसे त्रस्त झाल्याचं दिसेल. घराची सजावट आणि दुरुस्तीसाठी काही पैसे खर्च कराल, मात्र खर्च नियंत्रणात ठेवणं आपल्या हिताचं होईल. नोकरीत स्थान परिवर्तन संभवते. व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल, मात्र मन विचलित होऊ न देण्याची दक्षता आपणास घ्यावी लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. बहिणीच्या विवाहावर शिक्कामोर्तब झाल्याने कुटुंबात मंगल कार्यक्रमाचं आयोजन होईल. कुटुंबियांसह खरेदीस जाल.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती असल्याचे दिसून येईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवाल. या आठवड्यात आपल्या प्रेमिकेची भेट झाल्याने आपण अत्यंत खुश व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. भविष्यात उपयोगी होण्यासाठी आपण आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. व्यापारी व्यवसाय वृद्धीसाठी खूप प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. वैवाहिक जोडीदार भरपूर सहकार्य करेल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. व्यवसाय वृद्धीसाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना सुद्धा आहे. धन संचय कसा करावा हे आपण वरिष्ठांकडून शिकून घ्याल. पैतृक व्यवसायात काही बदल होऊन त्यात वृद्धी होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांना आपले परिश्रम वाढवावे लागतील. प्रकृतीत हळू - हळू सुधारणा होईल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी आपण आपल्या परिचितांशी बोलणी करत असल्याचे दिसून येईल. विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवते.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. जीवनात सुख - शांती नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपण थोडा वेळ कुटुंबियांच्या सहवासात व्यतीत करून आपणास भविष्यात उपयोगी होऊ शकतील, अशा बऱ्याच गोष्टी शिकाल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने आपली प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. धन लाभ संभवतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात आपण काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल, परंतु आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. वैवाहिक जोडीदारासह रोमँटिक रात्री भोजनास जाल.