मेष (ARIES) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार-विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई आणि स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्यानं अस्वस्थ राहाल.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून सुखद बातमी मिळाल्यानं मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळं स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्यानं डोकं शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनानं अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचं आहे. अतिरिक्त खर्चामुळं आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
कर्क (CANCER) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळं आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
सिंह (LEO) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज आपलं मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्यानं मन उदास होईल.
कन्या (VIRGO) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संततीविषयी चिंता लागून राहील. सट्टा-शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.
तूळ (LIBRA) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्यानं मनाला यातना होतील.