महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, वाचा गुरूवारचं राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

  • मेष (ARIES) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळं बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवावे आणि पाण्यापासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
  • वृषभ (TAURUS) :चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज शरीरानं आणि मनानं मोकळं वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळं काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल आणि प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडं अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • मिथुन (GEMINI) :चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र आणि शुभेच्छुकांचा सहवास लाभल्यानं मनास आनंद मिळेल.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. मित्र आणि स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • सिंह (LEO) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणं हितावह राहील. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित आणि विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल.
  • तूळ (LIBRA): चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल. एखादा प्रवास ठरवाल.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणं हितावह राहील. आजारावरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणं हिताचे राहील. वाणी आणि वर्तन संयमित ठेवणं हिताचं राहील. अती संवेदनशीलतेमुळं मन व्यथित बनेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामापासून दूर राहावं. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासाविषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर आणि द्विधा मनःस्थिती होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य आणि सन्मान प्राप्ती होईल. नववस्त्रांची खरेदी होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
  • मीन (PISCES) : चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे. पाण्यापासून शक्यतो दूर राहावं. मानसिक संतुलन सांभाळावं लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details