महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; मानसिक ताण वाढेल, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 09 JANUARY 2025

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2025, 2:21 AM IST

मेष (ARIES):चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाची सुरूवात आपण उत्साहानं कराल. मित्र आणि सगे सोयरे यांच्या येण्या-जाण्याने घरातील वातावरण आनंदाचं राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.

वृषभ (TAURUS):चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळं मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्यानं आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळं नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.

मिथुन (GEMINI): चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळं आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. पत्नी आणि संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

कर्क (CANCER):चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील आणि त्यामुळं पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. आईशी चांगले संबंध राहतील. धन,मान, सन्मान मिळेल. घर सजावटीत आपण लक्ष घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकारकडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.

सिंह (LEO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी-व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस जाणवेल.

कन्या (VIRGO): चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह आणि राग वाढल्यानं आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळं समस्या निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ (LIBRA) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजचा दिवस आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजेसाठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.

वृश्चिक (SCORPIO): चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज कौटुंबिक शांतीचं वातावरण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. आईकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल.

धनू (SAGITTARIUS) :चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्यानं निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. मुलांन विषयक चिंता राहिल्यानं मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.

मकर (CAPRICORN):चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्यानं मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. पाण्यापासून सावध राहावं लागेल. एखादी धनहानी आणि मानहानी संभवते.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. चिंता दूर झाल्यानं मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळं पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे आणि स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.

मीन (PISCES): चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. वाद आणि संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल.

हेही वाचा -

  1. मकर संक्रात 2025: यंदा संक्रात कशावर आली आहे? कोणत्या रंगाची साडी नेसावी? घ्या जाणून
  2. मकर संक्रांत 2025 काय आहे शुभ मुहूर्त? मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का परिधान करतात? घ्या जाणून
  3. दक्षिण भारतातील 'पोंगल' म्हणजे नक्की काय? कसा साजरा केला जातो हा सण, घ्या जाणून

ABOUT THE AUTHOR

...view details