मेष (ARIES) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात आहे. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्यांकडून लाभ होईल आणि त्यांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळं मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास-पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी आहे. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल. नवीन कार्याचं आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन, मान-सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. मानसिकदृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील. शरीराने थकाल आणि आळसामुळं कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणे हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
कर्क (CANCER): आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टम स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वास्थ्य राहील.
सिंह (LEO): आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार आणि व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वादापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.
कन्या (VIRGO): आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचं सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
तूळ (LIBRA): आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आपली वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल. तसेच त्यामुळं इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा-वादविवादात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकड लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.