महाराष्ट्र

maharashtra

नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं; काय करावं आणि काय करू नये; जाणून घ्या सविस्तर - Nag Panchami 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 1:30 PM IST

Updated : Aug 9, 2024, 6:56 AM IST

Nag Panchami 2024 : नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज राज्यभरात नागपंचमी सण (शुक्रवार, 9 ऑगस्ट) साजरा होत आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्यानं घरात सुख-शांती राहते तसेच कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असा समज आहे. पण नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी वाचा सविस्तर बातमी....

Nag Panchami 2024
नागपंचमी 2024 (ETV Bharat GFX)

हैदराबाद Nag Panchami 2024 :नागपंचमी हा सण (Nag Panchami) श्रावण शुक्ल पक्षाच्या (Shravan 2024) पाचव्या दिवशी साजरा केला जातो. देवतांमध्ये सापांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात. यावर्षी शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी 'नागपंचमी' साजरी होत आहे. परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नागपंचमीच्या दिवशी करू नयेत ते पाहूयात.

नागपंचमीच्या दिवशी काय करावं : नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु केतू भारी आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी. नागदेवतेला दूध, मिठाई आणि फुलं अर्पण करावीत. लक्षात ठेवा की, नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचं भांडं वापरावं. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत.

नागपंचमीच्या दिवशी काय करू नये :नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका. शेतात नांगरणी, जमीन खोदणं अशी कामं करू नका. याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानलं जाते. तसेच वृक्षतोड करू नका. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर, गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये.

भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा :भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात. त्याचे नाव अनेक देवी-देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे. इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. नाग हा रानात, शेतात राहणारा प्राणी आहे. पावसाळ्यात त्याच्या बिळ पाण्यानं भरते म्हणून तो गावात, घरात येतो. घरात तो अतिथी म्हणून येतो. त्यामुळं त्याचं पूजन करावं. नागाला शेतात राहायला आवडते. त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करतो. उंदीर, घुस इ. शेतात येऊ देत नाही. हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर एक उपकारच आहे.

Last Updated : Aug 9, 2024, 6:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details