मेष (Aries) :हा आठवडा आपणास कार्यात यश आणि सहकार्य मिळवून देणारा आहे. आपली वाणी भारदस्त आणि प्रभावशाली असल्यानं इतर व्यक्ती प्रभावित होतील. त्यामुळं आपण आपली कार्ये पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जेव्हा आपण एखादा मोठा निर्णय घ्याल तेव्हा आपल्या भावंडांचं आणि कुटुंबियांचं पूर्ण सहकार्य आपणास मिळेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना ह्या आठवड्यात अपेक्षित संधी मिळेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे काही लाभ होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात मुलांसंबंधी आनंददायक बातमी मिळाल्यानं घरातील वातावरण प्रसन्न होईल. भविष्यासाठी लाभदायी योजना बनविण्यास आपल्याला मदत होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. आपणास जर आपले प्रेम व्यक्त करावयाचं असेल तर ह्या आठवड्यात आपण तसे करू शकता. जे आधी पासूनच प्रेमात आहेत ते सुखद क्षण घालवू शकतील. आपल्या दांपत्य जीवनातील प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील. प्रकृती सामान्यच राहील.
वृषभ (Taurus) : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कामाची प्रशंसा होईल. आपणास वरिष्ठांचं आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यास सुख - सोयींसाठी आपला जास्त पैसा खर्च होण्याच्या शक्यतेमुळं आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागू शकते. आठवड्याच्या अखेरीस कोणताही निर्णय विचार करूनच घ्यावा. ह्या दरम्यान जमीन, घर आणि पित्याची संपत्ती ह्यांच्याशी संबंधित बाबी आपल्या त्रासास कारणीभूत ठरू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक देवाण - घेवाण करताना सतर्क राहावं लागेल. आपणास जर एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर त्याचं नियम आणि अटी नीट वाचून निर्णय घ्यावा, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात हास्य विनोदात वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
मिथुन (Gemini) :आठवड्याच्या सुरूवातीस कारकिर्दीशी किंवा व्यापाराशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीचं नवीन स्रोत होऊ शकतात. असं असलं तरी प्राप्तीच्या मानानं खर्चात वाढ होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना ह्या आठवड्यात चांगली संधी मिळेल. कोर्टात एखादा खटला चालू असला तर निर्णय आपल्या बाजूनं लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा आव्हानात्मक आहे. एखाद्या गोष्टीने आपण आणि आपली प्रेमिका ह्या दरम्यान गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशावेळी वाद न घालता संवाद साधून ते दूर करावेत. भावनेच्या आहारी जाऊ नये तसेच क्रोधीत होऊ नये. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी वाटू शकते. ह्या आठवड्यात विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी आपणास तयार राहावं लागेल. वादांचं निराकरण संवादानं करावं. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं. आपल्या जोडीदाराशी संबंध दृढ करावेत. आपल्या कुटुंबियांना आधार द्यावा. धीराने आणि सदभावनेने कामे करावीत, ज्यामुळं आपण आव्हानांना पार करू शकाल.
कर्क (Cancer): ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित एखादी योजना किंवा आपला व्यवसाय ह्यातून आपणास लाभ होईल. आपण जर एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी सौदा करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात त्यास संभाव्य स्वरूपात संपन्न करण्याचा प्रयत्न करावा. कारकिर्दीसाठी किंवा व्यापारासाठी केलेला प्रवास सुखद आणि यशस्वी होईल. परदेशात कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना नशिबाची साथ मिळेल. कदाचित आपले कुटुंबीय आपल्या प्रेम संबंधास मान्यता देऊन प्रेम विवाहावर शिक्कामोर्तब करतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात प्रवासाचा आनंद लुटू शकाल. कुटुंबियांसह आनंदाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल. आपणास कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी काही सकारात्मक घडामोडींचे संकेत देत आहे. आपली कामे वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपणास अपेक्षित बदली किंवा पदोन्नती मिळण्याची संभावना आहे. आपल्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात नवीन संधी मिळेल. आपले मित्र आपल्या कामात मदत आणि सहकार्य करतील. एखादा मोठा निर्णय घेताना आपणास कुटुंबियांचे समर्थन आणि सहकार्य मिळेल. आपले वडील नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपला बहुतांश वेळ हा धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. ह्या दरम्यान आपण सन्मानित सुद्धा होऊ शकता. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा शुभ फलदायी आहे. आपल्यातील गैरसमज दूर होऊन आपल्यातील प्रेम पुन्हा वृद्धिंगत होऊ शकते. आपणास प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
कन्या (Virgo) :ह्या आठवड्याची सुरूवात आपल्या मार्गातील एखादा मोठा अडथळा दूर होण्याने होईल. आठवड्याचा पूर्वार्ध आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य आपणास मिळेल. आपले प्रवास, यशस्वी आणि लाभदायी होतील. आपली प्रतिष्ठा निव्वळ आपल्या कार्यक्षेत्रीच नाही तर कुटुंबात व समाजात सुद्धा उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपली धार्मिक रुची वाढीस लागेल. कदाचित एखादी तीर्थयात्रा सुद्धा होऊ शकते. मात्र, ह्या आठवड्यात ऋतुजन्य किंवा जुनाट आजारांमुळं शारीरिक कष्ट होण्याची संभावना असल्यानं आपणास आपल्या प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास प्रेमिकेसह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यात आपली प्रेमिका आपणास पूर्ण सहकार्य करेल. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. समोतल आहार आणि नियमित व्यायाम आपले आरोग्य सुरक्षित ठेवेल.
तूळ (Libra) :हा आठवडा आपल्यासाठी कारकिर्दीत आणि व्यापारात प्रगतीच्या संधीसह प्रकृती व वेळेचा अभाव घेऊन येणारा आहे. आपणास मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी लक्ष द्यावं लागेल, जेणे करून आपणास प्रकृती आणि वेळेकडं योग्य तितके लक्ष देता येईल. प्रकृतीकडील दुर्लक्ष आपणास त्रासदायी होऊ शकते. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याच्या मध्यास घर, जमीन इत्यादींशी संबंधित वाद संभवतात. जे आपल्या काळजीस कारणीभूत होऊ शकतात. ह्या बाबतीत आपणास वैवाहिक जोडीदाराची मदत व सहकार्य मिळेल. आपला जोडीदार नेहमी आपल्या पाठीशी उभा राहील. ह्या समस्या सोडविण्यासाठी आपणास संयम आणि आपले बुद्धी चातुर्य दाखवावे लागेल. ह्या आठवड्यात प्रणयी जीवनात सुद्धा काही त्रास संभवतो. आपल्या प्रेमिकेचे आपल्या कुटुंबियांशी एखादा वाद संभवतो. असं झाल्यामुळं आपल्याला एकटेपणा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत आपणास धैर्य आणि विवेकपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, जेणे करून आपला त्रास कमी होऊ शकेल.
वृश्चिक (Scorpio) :हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्यवर्धक आहे. जीवनातील कोणत्याही आव्हानांचा सामना करताना आपल्या बुद्धी व विवेकाच्या जोरावर समस्यांचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचा पूर्वार्ध अत्यंत शुभ फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपली मनोकामना पूर्ण होऊन शासनाशी संबंधित एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी आपणास मिळेल. कोर्टातील खटल्यात सुद्धा आपण यशस्वी व्हाल. आपले विरोधक समझोता करण्यासाठी समोरून आपल्याकडं येतील. परंतु, अशावेळी आपले विरोधक आपल्या एखाद्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्यानं आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा शुभ फलदायी आहे. आपणास प्रेमिकेकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल.
धनु (Sagittarius) : हा आठवडा आपणास अनुकूल असण्याची संभावना असली तरी, आळस आणि अहंकारापासून आपल्याला दूर राहावं लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात आपली कामे पूर्ण उत्कटतेने करण्यात आपणास नक्कीच यश प्राप्त होईल. आपल्या ध्येयपूर्तीसाठी आपले मित्र आणि कुटुंबियांचे समर्थन मिळेल. आपण जर एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर आपणास त्या संबधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी आपणास आपल्या प्रेमिकेच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढून तो जोडीदारास समर्पित करावा. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं. आपला आहार आणि दिनचर्या ह्यावर बारीक नजर ठेवावी.
मकर (Capricorn) : हा आठवडा कार्यात अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. ज्यांना आपल्या व्यापाराचा विस्तार करण्याची इच्छा आहे, त्यांची हि मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. दलाली क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी होऊ शकतो. जर आपण अनेक दिवसांपासून घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली हि इच्छा पूर्ण होऊ शकते. युवकांचा अधिकांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. व्यवसायाशी संबंधित निर्णय उत्साहाच्या भरात घेऊ नका, अन्यथा नंतर आपणास पश्चाताप होऊ शकतो. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी तसेच आपसातील विश्वास वाढण्यासाठी आपणास आपल्या प्रेमिकेच्या लहान-सहान गोष्टींकडं लक्ष द्यावं लागेल. कोणत्याही समस्येचं निराकरण करताना आपसात वाद न घालता संवाद साधणं उचित होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. जोडीदाराचे सहकार्य आपणास पाउलोपाउली मिळेल.
कुंभ (Aquarius) :ह्या आठवड्यात आपल्यात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळं आपणास आपली कामे उत्तम प्रकारे आणि वेळेवर करण्यास मदत होईल. आपल्या कामगिरीची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. शासनाशी संबंधित व्यक्तींना महत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. आपण जर अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असाल तर ह्या आठवड्यात आपणास चांगली संधी मिळू शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांना लाभदायी होऊ शकतो. त्यांना मोठा धनलाभ संभवतो. आठवड्याच्या अखेरीस घराची दुरुस्ती किंवा सजावटीसाठी पैसा खर्च होऊ शकतो. प्रणयी जीवनात काही मतभेद झाल्यानं किंवा एकमेकांना भेटण्यास वेळ न मिळाल्यामुळं आपलं मन काहीसे उदास होऊ शकते. अशावेळी एखादा मित्र आपली हि समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल.
मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी व्यावसायिक यशाचा आणि कौटुंबिक आनंदाचा होऊ शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात, व्यवसायात व इतर क्षेत्रात मोठे यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळं आपली प्रगती व कौटुंबिक सुख-शांततेत वृद्धी होऊ शकते. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यानं आपणास धनलाभ, यश मिळू शकते. कला, संगीत आणि पत्रकारितेशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. जर आपण व्यवसायात वाढ करण्याचा विचार करत असाल तर आपली हि इच्छा ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. कोर्टातील खटल्यात निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. वरिष्ठांच्या मध्यस्थीने सर्व विवाद संपुष्टात येऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस आपण आपल्या कुटुंबियांसह एखादा प्रवास करू शकता. आपणास कुटुंबियांच्या सहवासात मजेत वेळ घालविण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीची अतिरिक्त साधने उपलब्ध होऊ शकतात. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपसातील विश्वास वृद्धिंगत होईल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरल्यानं घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
हेही वाचा -
- पितरांची तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला 'या' पितरांचं करा श्राद्ध; जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ - Sarvapitri Amavasya 2024
- शारदीय नवरात्र 2024; अशी करा घरात घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024
- शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours