महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींना स्त्री मित्रांचं मिळेल सहकार्य: जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope 14 October 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Horoscope 14 October 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मेष Horoscope 14 October 2024 :आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलधार्‍यांकडून लाभ होऊन त्यांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास - पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.

वृषभ : आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबीक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन : आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकांबरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

कर्क : आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम आणि चोरी या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.

सिंह :आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.

कन्या : आज कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - व्यवसायात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या समजतील.

तूळ : आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणे आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक आणि मानसिक उत्साहाबरोबरच आज सर्व कामे कराल.

वृश्चिक :आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती आणि वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.

धनू : आज आपणास गूढ आणि रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. व्यापार - व्यवसायात प्रगती होईल.

मकर :आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत म्हणून याची आवश्यकता आहे. विद्यार्थीवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील. उजव्या डोळ्यास त्रास होण्याची शक्यता आहे.

कुंभ : आजचा दिवस शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती व धनप्राप्ती होईल. संपूर्ण दिवस प्रसन्न वातावरणात घालवू शकाल.

मीन :आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट - कचेरीतील प्रकरणे या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आर्थिक देवाण - घेवाणीसाठी अनुकूल नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details