मेष Horoscope 28 August 2024 :आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामं करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये.
वृषभ :आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावं लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्यानं आपण यशस्वी व्हाल आणि त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल. आपल्या राशींवर भगवान श्रीकृष्णांचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी अनुकूल नाही.
मिथुन : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र आणि नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल आणि त्याचबरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.
कर्क : आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपणास खिन्नता आणि भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्यानं कौटुंबीक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्यानं आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर, मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडं लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज आणि मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सिंह :आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडं गाफील राहिलात तर लाभापासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडं लक्ष द्यावं. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
कन्या : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुनं येणं वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामं पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.