महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल नोकरीत लाभ; वाचा रविवार राशीभविष्य - आजचे राशीभविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 18 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ....

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 6:06 AM IST

  • मेष : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळं मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणं आवश्यक आहे. बाहेरचे खाणं-पिणं टाळणं हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार येतील. आर्थिकदृष्ट्या सुद्धा दिवस मध्यम फलदायी आहे.
  • वृषभ : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळं कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढेल.
  • मिथुन : आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्यानं प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय आणि संततीशी मतभेद संभवतात. संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा आणि व्यवहारात नम्रपणे वागावं लागेल.
  • कर्क : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस उत्साहात आणि आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी आणि संततीकडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
  • सिंह: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळं आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
  • कन्या :आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा आणि अशक्तपणामुळं कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी आणि अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.
  • तूळ : आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हिताचे राहील. कोणावर रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणं हितावह ठरेल. शत्रूपासून सावध राहावं लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडं आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.
  • वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन आणि भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल.
  • धनू :आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
  • मकर: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. निर्णयाच्या अभावामुळं मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.
  • कुंभ :आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रां विषयी सावध राहावं लागेल.
  • मीन: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य यामुळं कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. स्वकीयांशी जवळीक वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

ABOUT THE AUTHOR

...view details