मेष (ARIES): आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहावं लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्यानं सावध राहावं लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणानं काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावं लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संततीविषयक काळजी निर्माण होईल.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क (CANCER) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.
सिंह (LEO): आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचं वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील, त्यामुळं आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कन्या (VIRGO) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्यानं निराश व्हाल. संततीविषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.
तूळ (LIBRA) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्तीविषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावं लागेल. आईची तब्बेत बिघडू शकते.