महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशीभविष्य - Horoscope 16 August 2024 - HOROSCOPE 16 AUGUST 2024

Horoscope 16 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 12:11 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपला राग नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळं मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्यानं मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या-पिण्याकडं लक्ष द्यावं लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मिथुन (GEMINI) :आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज शारीरिक, मानसिक उत्साहामुळं प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन, वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल.

कर्क (CANCER) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस यशदायी आणि आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा-समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.

सिंह (LEO):आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास लेखन, साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.

कन्या (VIRGO) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य चांगले राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी-विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका संभवतो.

तूळ (LIBRA) :आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. नवीन कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक, मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान वाढेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.

मकर (CAPRICORN) :आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्यानं मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट-कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळं आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन (PISCES): आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळं वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ आणि वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. आपली मान-प्रतिष्ठा उंचावेल.

हेही वाचा -

ऑगस्टचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार फलदायी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ABOUT THE AUTHOR

...view details