महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींना व्यापारात मोठा धनलाभ; मेष ते मीन राशींना गुरूवार कसा जाणार? वाचा राशी भविष्य - Horoscope 11 July 2024

Horoscope 11 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 5:14 AM IST

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)

  • मेष (ARIES) :चंद्र आज सिंह राशीत आहे. आज आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्यानं हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्यासंबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडं दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडं लक्ष द्यावं लागेल.
  • वृषभ (TAURUS) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या असेल. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण आणि अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार आणि खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.
  • मिथुन (GEMINI) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे आणि शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.
  • कर्क (CANCER): गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तनापासून दूर राहणं हितावह राहील.
  • सिंह (LEO) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा आणि अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.
  • कन्या (VIRGO) : गुरूवार च्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणं आणि गर्व ह्यामुळं कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरीपासून दूर राहणं हितकर होईल.
  • तूळ (LIBRA) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्यानं शारीरिक आणि मानसिकदृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळतील.
  • वृश्चिक (SCORPIO) : गुरूवार च्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान-सन्मान उचांवेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ आणि वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र-स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.
  • धनू (SAGITTARIUS) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संततीविषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.
  • मकर (CAPRICORN) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज आहाराकडं लक्ष द्यावं लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावं लागेल.
  • कुंभ (AQUARIUS) :गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल ह्यामुळं प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन आणि नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.
  • मीन (PISCES) : गुरूवारच्या दिवशी सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचं असल्यामुळं दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणं ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details