महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

गणपती बाप्पाच्या कृपेनं कसा जाईल सप्टेंबरचा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) सुरुवात झाली. तर 17 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. हे दिवस सर्वांसाठी आनंदाचे असणार आहेत. या आठवड्यात प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'वर वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 6:41 PM IST

Updated : Sep 7, 2024, 7:04 PM IST

  • मेष (Aries) :ह्या आठवड्याची सुरूवात काहीशी आपल्या व्यस्ततेने होईल. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्राशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यास जास्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. ह्या दरम्यान वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं मनास थोडे वाईट वाटू शकते. एखाद्या विशिष्ठ व्यक्तीच्या सहकार्याने व्यवसाय वृद्धीची कामना पूर्ण होईल. तसेच त्या दिशेचे केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होईल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्यच आहे. प्रेमिकेशी संबंध सामान्यच राहतील. तिच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या कामाच्या बाबतीत इतरांच्या भरवशावर राहू नये, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपणास कामाव्यतिरिक्त आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. अशावेळी आपली दिनचर्या आणि आहार योग्य असावा.
  • वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस एखाद्या होऊ घातलेल्या कामात अचानकपणे मोठी अडचण आल्याने मन खिन्न होईल. ह्या दरम्यान प्राप्तीची साधने बाधित झाल्याने आणि अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च होतील. त्यामुळं आर्थिक चिंता भेडसावेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित बदली, पदोन्नती किंवा कार्यक्षेत्रातील बदल करण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. ह्या दरम्यान व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायी होतील. आठवड्याचा उत्तरार्ध आपणास अनुकूल असल्याचं दिसून येईल. आठवड्याच्या अखेरीस मुलांशी संबंधीत एखादी चांगली मोठी बातमी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ राहतील. प्रेमिकेशी सामंजस्य वाढेल. आपणास प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू देखील मिळू शकते. दांपत्य जीवनात जोडीदाराकडून सुख व सहकार्य मिळत राहील.
  • मिथुन (Gemini) :ह्या आठवड्यात आपणास प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. असं असलं तरी ह्या संधींचा लाभ घेण्यासाठी आपणास आपल्या वेळेचे व ऊर्जेचे नियोजन करावे लागेल. ह्या दरम्यान कामानिमित्त जवळचे किंवा दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. हे प्रवास दमछाक करणारे व लाभदायी होतील. प्रणयी जीवनात विचारपूर्वक वाटचाल करावी. आठवडा अखेरीस कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. आठवड्याच्या मध्यास एखादी कौटुंबिक समस्या आपल्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. ह्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. प्रकृतीकडं दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत यश प्राप्तीसाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
  • कर्क (Cancer) : ह्या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ आपणास सहकार्य करत असल्याचं दिसून येईल. आपण आपल्या परिश्रमाच्या व पुरुषार्थाच्या जोरावर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जमीन, घर किंवा वाहन ह्यांचे सौख्य प्राप्त होऊ शकते. ह्या दरम्यान आपणास आपल्या स्पर्धकांना जोरदार टक्कर द्यावी लागू शकते. आपण जर व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक पुढचे पाऊल उचलावे. तसेच कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या महिला मित्राच्या मदतीनं आपण आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. कुटुंबीय आपल्या प्रेम संबंधाचा स्वीकार करून विवाहासाठी अनुमती देऊ शकतात. प्रेमिकेसह हसत- खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • सिंह (Leo) : हा आठवडा आपणास मानसिक व सामाजिक यश मिळवून देणारा आहे. आठवड्याची सुरूवात शुभ घटनेने होईल, जी आपल्या सन्मानाची वाढ करण्यास मदतरूप ठरेल. आपणास एखाद्या कार्यामुळं कार्यक्षेत्री किंवा समाजात सन्मानित केले जाऊ शकते. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा किंवा कारकीर्द घडविण्याचा विचार करत असणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. आपली सर्व स्वप्ने साकार होऊन आपणास यश प्राप्ती होईल. आठवड्याचा मध्य व्यापारी वर्गासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. आपणास आपल्या आहारावर व दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात सट्टा, लॉटरी किंवा शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करू नये. आपणास निव्वळ कष्ट केल्यानेच लाभ होणार आहे. ज्या प्रेमीजनांच्या जीवनात कटुता आली असेल त्यांना एखाद्या महिला मित्राच्या मदतीनं ती दूर करता येईल. आपले प्रेम संबंध दृढ करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • कन्या (Virgo) :ह्या आठवड्यात आपणास धीरानं कामे करावी लागतील. घाई-गडबडीत किंवा दबावा खाली कामे करू नयेत. विशेषतः आठवड्याच्या सुरूवातीस कामाचा भार जास्त असण्याची संभावना असल्यानं हे लक्षात ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री आपल्या कामात खोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. आपल्या योजना कार्यान्वित करण्यापूर्वी आपण जर त्याचे गुणगान केले तर त्रासापासून दूर राहता येऊ शकेल. व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपले भिन्नलिंगी व्यक्ती प्रती आकर्षण वाढू शकते, परंतु आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते , परंतु त्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा आपणास त्रासास सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकवून ठेवणे आपल्यासाठी हितावह होईल.
  • तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी वास्तविकतेसह विभिन्न परिस्थितींचा सामना करण्याचा असू शकतो. ह्या आठवड्यात आपणास सांसारिक प्रवासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हे प्रवास आपल्यासाठी लाभदायी होऊ शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात. ह्या दरम्यान आपणास आपल्या व्यवसायात अपेक्षित लाभ न झाल्यानं आपण त्रस्त होऊ शकता. हा आठवडा आपल्यासाठी उत्तेजना व आव्हानाने भरलेला असेल. कार्यक्षेत्री लक्ष केंद्रित करण्याचे संकेत आपणास मिळू शकतात, ज्यासाठी आपणास सतर्क राहावे लागेल. हा आठवडा संबंधांच्या दृष्टीने सुद्धा वादग्रस्त होऊ शकतो. समस्यांना संयमाने व विचारपूर्वक सामोरे जावे, जेणेकरून आपणास अपेक्षित समाधान प्राप्त होऊ शकेल. प्रवासाच्या बाबतीत सतर्क राहावे. सुरक्षा नियमांचे पालन करावे.
  • वृश्चिक (Scorpio) :हा आठवडा आपल्यासाठी संधींच्या जोडीने थोडा त्रास घेऊन येणारा आहे. आपणास आपल्या कार्यात अधिक परिश्रम करावे लागतील. यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. ज्या व्यक्ती भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना भागीदाराद्वारा निर्माण केल्या जाणाऱ्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी आपण भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा आपणास आर्थिक नुकसान होऊ शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना लक्ष देण्याची गरज भासेल. प्रेम संबंधात सुद्धा आपणास सतर्क राहावे लागेल. आपणास आपल्या जोडीदाराच्या निराशा व मजबुरीच्या व्यतिरिक्त भावनांचा सन्मान सुद्धा करावा लागेल. त्यांच्याशी संवाद साधून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक उत्कृष्ट वैवाहिक जोडीदारासाठी हे आवश्यक आहे कि एकमेकांच्या भावनांचा विचार करून व संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे.
  • धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक व उत्साहजनक असण्याची संभावना आहे. कार्यक्षेत्री आपणास महत्वाची जवाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कामगिरीची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांच्या जुन्या व नवीन योजना यशस्वी होऊन प्रगती होऊ शकेल. आपल्या काही कामात आव्हाने येऊ शकतात. परंतु आपली बुद्धिमत्ता व संयमाच्या जोरावर आपण हि आव्हाने परतवू शकाल. व्यापार विस्तार करण्याच्या विचारात असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा महत्वाचा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. हा आठवडा आपण व आपली प्रेमिका या दरम्यान उत्तम समन्वय व सामंजस्य निर्माण करण्याची स्थिती घेऊन येणारा आहे. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आपणास आपल्या जोडीदाराचे सहकार्य प्राप्त होईल.
  • मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी कठीण व आव्हानात्मक असू शकतो. आपणास कुटुंब व घराशी संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागू शकतो, जो आपणास त्रस्त करण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपले वरिष्ठ व सहकारी ह्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. आपला कष्टाळू व समर्पित होण्याचा दृष्टिकोन आपणास यशस्वी होण्यास मदत करू शकेल. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करून त्यांचे सहकारी व्हा. आपणास तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. नियमित व्यायाम, आहार व आराम यांचे पालन करावे लागेल. जर आरोग्य विषयक एखादी समस्या असेल तर त्याकडे लक्ष देऊन योग्य उपचारासाठी तज्ञ चिकीत्सकाचा सल्ला घ्यावा. जीवनात कठीण परिस्थिती व आव्हाने येतात व जातात हे लक्षात ठेवावे. ह्याकडे एक संधी म्हणून पाहावे, जी आपणास विकास व स्वयं परिवर्तनाची संधी देते. संघर्षाच्या माध्यमातून आपण स्थायी समाधान व समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू शकता.
  • कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपणास काहीसा दिलासा देणारा आहे. आपली कामे वेळेवर पूर्ण होतील व त्यामुळं आपला आत्मविश्वास उंचावेल. मित्रांच्या मदतीने आपली स्थगित झालेली कामे पूर्णत्वास जातील. रोजगारात येणारे अडथळे दूर होतील. आपणास आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक कष्टांच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. प्रकृतीच्या बाबतीत सतर्क राहावे. लहान-सहान समस्यांकडं दुर्लक्ष करू नये, अन्यथा आपणास रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला आपण जरूर घ्यावा. कोणत्याही प्रकारची जोखीम असणाऱ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करू नये. ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनाची ईर्षा करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल.
  • मीन (Pisces) :हा आठवडा आपल्यासाठी शुभ व सौभाग्यदायी होण्याचे संकेत आहेत. आपल्या कारकिर्दीत व व्यापारात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं आपल्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपणास आपल्या सुख-सोयींसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. आपण आपल्या कार्यक्षेत्री मिळालेल्या जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. असं असलं तरी आपणास स्वजनांच्या भावनांकडं लक्ष द्यावं लागेल व त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण जर ह्या पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात आपणास त्यातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. आपणास व्यवसाय वृद्धीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून महत्वाचा प्रस्ताव मिळू शकतो. आपण जर एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देऊ इच्छित असाल तर हा आठवडा त्यासाठी अनुकरणीय होऊ शकतो. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. आपण व आपल्या जोडीदारा दरम्यान सलोख्याचे संबंध राहतील. आरोग्य सामान्यच राहील.

हेही वाचा -

Last Updated : Sep 7, 2024, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details