महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

पाचव्या श्रावण सोमवारी वाहा 'सातूची' शिवामूठ; जाणून घ्या सातूचे आरोग्यदायी फायदे, 72 वर्षांनी आलाय 'हा' योग - Fifth Shravan Somvar 2024

Shravan Somvar 2024 : हिंदू धर्मात श्रावण सोमवारला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. 2 सप्टेंबर 2024 रोजी राज्यात पाचवा म्हणजेच यावर्षीचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. शेवटच्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ (Shravan Somvar Shivamuth) वाहावी? काय आहे या शिवामूठचे महत्त्व? वाचा सविस्तर बातमी....

Shravan Somvar 2024
श्रावणी सोमवारी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 3:38 PM IST

हैदराबाद Shravan Somvar 2024 : देशभरातील लाखो शिवभक्त श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची विशेष पूजा करतात. या दिवशी (Shravan Somvar Shivamuth) आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शंकराला प्रिय असलेले बेलाचे एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

सातूची शिवामूठ वाहावी : यंदा शेवटच्या श्रावण सोमवती अमावस्या आहे. यावर्षी पाच श्रावणी सोमवार आले आहेत. या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवारीच झाली होती, तर शेवटही सोमवारीच होत आहे. त्यामुळं तब्बल 72 वर्षांनी हा शुभ योग आलाय. मागील चार सोमवारी शंकराला शिवामूठ वाहायला जमलं नसेल तर, शेवटच्या सोमवारी भगवान महादेवाला मूठभर 'सातूची शिवामूठ' नक्की अर्पण करा. पाचव्या श्रावणी सोमवारी सातूची शिवामूठ वाहावी लागणार आहे.

सातू म्हणजे काय? : सातू एक धान्य आहे. सातूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. यात जीवनसत्व आणि इतर पोषक घटक जास्त असतात. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं सातूला खूप महत्त्व आहे.

आरोग्यदायी फायदे : सातूचे सेवन केल्यानं चांगलं पचन होतं. तसेच वजन कमी होतं. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळं सातत्यानं सातूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

'या' पद्धतीनं करावी महादेवाची पूजा : सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.

भारतीय संस्कृतीची शिकवण : आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायाचं. त्यामुळं देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं. ज्यांना मंदिरात जाता येत नाही, त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावं.

(टीप : सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' दावा करत नाही)

हेही वाचा

  1. कालीपूजेचा इतिहास - History of Kali Worship
  2. कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami
  3. उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic

ABOUT THE AUTHOR

...view details