मेष : चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती आठव्या भावात असेल. आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. शरीरात थकवा, मनात आळस आणि अस्वस्थता राहील. नेमून दिलेल्या कामासाठी प्रयत्नशील राहा. धार्मिक यात्रा घडेल. आज तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते चुकीच्या दिशेनं असू शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणं महागात पडू शकतं.
वृषभ : चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती सातव्या भावात असेल. आज आपण प्रिय मित्र आणि नातेवाईकांसोबत प्रवासाचा आनंद घ्याल. सुंदर कपडे, दागिने आणि भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. वाहनं सावकाश चालवा. कुटुंबात कोणाशी वाद होऊ शकतो. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकते. आज व्यवसायात प्रगती होऊ शकते. गुंतवणुकीशी संबंधित योजना आज करू नका.
मिथुन : चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती सहाव्या घरात असेल. आज आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. शारीरिक ऊर्जा आणि मानसिक आनंदाचा अनुभव घ्याल. अपूर्ण काम पूर्ण झाल्यानं आनंद वाढेल. व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुमचं लक्ष मनोरंजनावर राहू शकते. मित्र आणि नातेवाईकांसोबत फिरण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील.
कर्क : चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती पाचव्या भावात असेल. भविष्यासाठी आर्थिक योजना बनवण्यासाठी चांगला वेळ आहे. एकाग्रतेनं काम केल्यास यश नक्कीच मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरणात शांतता राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि आनंदी वाटेल. अपूर्ण कामं पूर्ण होतील. व्यवसायात सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. आज मित्र किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत बनू शकतात.
- सिंह : चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती चौथ्या भावात असेल. आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. साहित्यनिर्मिती अंतर्गत मूळ काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळेल. प्रिय मित्रासोबतची भेट शुभ राहील. त्यामुळं मन दिवसभर प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप चांगला आहे. आज आपण धर्मादाय कार्यात व्यस्त असाल.
कन्या :चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती तिसऱ्या घरात असेल. आज तुम्हाला संकटांसाठी तयार राहावं लागेल. आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वेळ अनुकूल नाही. वाहन आणि स्थायी मालमत्तेशी संबंधित काही समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. खर्च होण्याचीही शक्यता आहे.
- तूळ :चंद्र आज आपली राशी बदलेल आणि वृश्चिक राशीत असेल. आपल्यासाठी चंद्राची स्थिती दुसऱ्या घरात असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. विरोधकांवर मात करू शकाल. प्रत्येक कामात यश मिळेल. आज नातेवाईकांशी भेट होईल. मानसिकदृष्ट्याही आनंदी राहाल. नात्यातील चढ-उतार अस्वस्थ करतील. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहील.