हैदराबाद Diwali 2024 :हिंदू धर्मात दिवाळी सणाला (Diwali Festival 2024) विशेष महत्त्व आहे. आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी केला जाते. दिवाळीला 'दीपावली' असेही म्हणतात. पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी संपते.
- वसुबारस :28 ऑक्टोबर 2024
- धनत्रयोदशी : 29 ऑक्टोबर 2024
- नरक चतुर्दशी : 31 ऑक्टोबर 2024
- लक्ष्मी पूजन :1 नोव्हेंबर 2024
- दिवाळी पाडवा: 2 नोव्हेंबर 2024
- भाऊबीज : 3 नोव्हेंबर 2024
कधी आहे वसुबारस ? (Vasubaras 2024) :वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते. याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. यंदा वसुबारस 28 ऑक्टोबरला आहे.
कधी आहे धनत्रयोदशी ? (Dhanteras 2024) :दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. जी पंचांगानुसार त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. धनत्रयोदशीला धन्वंतरी जंयती असंही म्हणतात. धनत्रयोदशीला धन्वंतरी देव, कुबेर देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी असतो. हा दिवश खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. यंदा मंगळवारी 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. तर धनत्रयोदशीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 6:31 पासून रात्री 8:31 पर्यंत असणार आहे.
कधी आहे नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) : यावर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजेपर्यंत असणार आहे. यंदा नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर गुरुवारी आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं आणि तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं.