कोल्हापूर : काँग्रेसचा इतिहास देशाला धोका देणारा आहे, काँग्रेसनं भारताला दोन तुकड्यात विभागण्याचं काम केलं. मात्र, महाराष्ट्राच्या भूमीनं देशाला लढणं शिकवलं, शूरवीर आणि आत्मस्मारपणाची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी निवडणं म्हणजे देशाला धोका देण्यासारखं आहे. महाविकास आघाडीतील नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. त्यांची नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी आघाडी केली असती का? असा सवालही त्यांनी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केला.
महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करा : "लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यांना तुम्ही जिंकवल, आता मी आभार मानण्यासाठी आलो आहे. कोल्हापूरच्या या ऐतिहासिक भूमीतून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करा," असं आवाहन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ (Source - ANI) मल्लिकार्जुन खर्गे यांचं घर निजामानी जाळलं : "काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी इथं आल्या होत्या. समाजात फुट पाडण्यासाठी त्या आल्या होत्या का? असा उपस्थित होताय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं घर निजामानी जाळलं होतं. त्यांच्या आई, बहीणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. निजाम काळातील रझाकारांनी हे कृत्य केलं होतं. निजाम कोण होता? हे खर्गे कधीच सांगत नाहीत, त्यांच्यावर कोणता दबाव आहे का?ठ असा सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थित केला. "कोल्हापूरच्या विशाळगडावर ताबा मिळवण्यासाठी मुस्लिम कट्टरपंथी प्रयत्न करत आहेत. महायुतीचं सरकार निवडून द्या, असा प्रयत्न होणार नाही," असं आवाहन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोल्हापूरकरांना हिंदुत्वाचा हुंकार भरला.
खासदार धनंजय महाडिक यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर :लाडक्या बहिणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना उद्धव ठाकरेंनी लक्ष केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर धनंजय महाडिक यांनी आज जाहीर सभेत उत्तर दिलं. "माझ्या केसालाही धक्का लागणार नाही", असं महाडिक म्हणालेत. यामुळं आता कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या प्रतिष्ठेच्या सामन्यात कोल्हापूरकर नेमकं कोणाच्या बाजूनं उभे राहतात हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
- मतदानाच्या दिवशी 'चप्पल' घालून गेल्यास कडक कारवाई? उमेदवारानं केली मागणी
- ऐन निवडणूक प्रचारात अजित पवारांना दणका; निवडणूक आयोगाचा आक्षेप
- "बाळासाहेब ठाकरे अन् काँग्रेसचं वैर..."; नात्याची आठवण करुन देत संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल