छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackarey : राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स येत आहेत आणि दुसरीकडं गुत्तेदार निवडणूक लढवत आहेत. नुसतं मोदी बाबा मोदी बाबा म्हणत शिक्का मारायचा का? ही उद्धव ठाकरेंची लढाई नाही, ही तुमची लढाई लढत आहे. माझं काही जात नाही, मला तर डोळा मारला त्यांनी मात्र, माझ्या महाराष्ट्राचं नुकसान होणार असेल, मला नकली म्हणतात तुम्हाला बाळासाहेबांच्या मुलाचा इंगा दाखवतो असा इशारा उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय. मला सल्ला दिला होता असं म्हणतात तर मग माझ्या हातापायांची हालचाल करु शकत नव्हतो, त्यावेळी तुमच्या चेले चपाटे यांनी माझ्या लोकांना फोडून सरकार पाडलं, तेव्हा शिवसेना प्रमुखांना काय वाटलं असतं हा विचार करायला पाहिजे होता. त्यांना काय वाटतं त्यांची चिंता करु नका. महाराष्ट्रानं तुम्हाला रस्त्यावर आणलं आता रोड शो करावे लागत आहेत, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांच खैरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
निवडणूक आयोगावर मोदींचा दबाव :या सभेत बोलताना ते म्हणाले, शिंदे बोलताना ताणून बोलतात पोट साफ करायचा औषध घ्या. मोदी आणि शहा यांनी धनुष्यबाण देण्याचं काम केलं म्हणून ते आभार मानतात. माझ्या बापाचं नाव लावावं लागतं, तुझ्या वडिलांचं नाव लावू शकतं नाही. निवडणूक आयोगाचा वापर करुन नाव आणि चिन्ह दिलं. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना देखील वापरुन घेतलं. कोषारी नावाच्या माणसानं जे केले त्यावर न्यायालयानं ताशेरे ओढले. जो निर्णय दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो. मात्र मोदी सर्वोच्च न्यायालयात दबाव टकण्याचं काम तुम्ही करत आहात. आम्हाला नकली म्हणता तुमचं नाटक चार जून पर्यंत चालतील. नोट बंदी जाहीर केली तशी, महाराष्ट्रात तुमच्या नावाचं नाणे बंद होईल, तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहतील. महाराष्ट्र मेला तरी चालेल गुजरात जिवंत राहिला पाहिजे ही तुमची वृत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.