पुणे Sanjay Raut : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचं सरकार आलं असून या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीला देखील 240 जागा मिळाल्या आहेत. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी असते तर आमच्या 20 ते 25 जागा वाढल्या असत्या असं संजय राऊत म्हणाले. पुण्यात आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut - SANJAY RAUT
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असते तर आम्हाला 20 ते 25 जागा जास्त मिळाल्या असत्या, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
Published : Jun 29, 2024, 4:34 PM IST
विधानसभेत आम्हीच जिंकणार : विधानसभेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे असं राऊत म्हणाले होते. यावर पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर राऊत म्हणाले,"राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. कोणतीही संस्था ही बिनचेहेऱ्याची असू नये. आपण कोणाच्या नावानं मतदान मागत आहोत हे लोकांना कळायला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लवकरच बसून याबाबत निर्णय घेऊ." तसंच आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यात एकत्र निवडणूक लढवणार आहोत. साधारणतः हा 175 ते 180 जागा या आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन फडणवीस यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं संजय राऊत म्हणाले. या राज्यातील जनतेनं त्यांचं नेतृत्व तसंच त्यांच्या आघाड्या या धुडकावून लावल्या आहेत. ते स्वतःला नाना फडणवीस यांचा मोठे भाऊ समजत होते. नाना फडणवीस साडेतीन शहण्यापैकी एक होते. पण फडणवीस हे त्यांच्यातील नाही, असंही यावेळी राऊत म्हणाले.
हेही वाचा :