महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

सुषमा अंधारेंचं ठरलं! 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार? - Sushma Andhare Vidhan Sabha - SUSHMA ANDHARE VIDHAN SABHA

Sushma Andhare Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे.

Lok Sabha Elections 2024
सुषमा अंधारे (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 9:32 PM IST

पुणे Sushma Andhare Vidhan Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पार पडून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. आता सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठका आणि दौरे सुरू केलेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. निवडणुकीसाठी विद्यमान आणि इच्छुक नेत्यांनी देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात बैठका घेण्यास सुरुवात केली. अशातच पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

सुषमा अंधारेंना उमेदवारी मिळणार? : "उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय" असा मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आलेत. या फ्लेक्सबाजीमुळं वडगावशेरी मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सुषमा अंधारे वडगांवशेरी या मतदार संघातील धानोरी भागात वास्तव्यास आहेत. शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी हडपसर, वडगावशेरी आणि कोथरूड हे मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावेत, अशी अपेक्षा अनेक शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रचंड मतांनी निवडून येणार : या फ्लेक्सबाबत ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख आनंद गोयल यांनी प्रतिक्रिया दिली."मागील दीड वर्षाच्या कालावधीत सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरण ते कल्याणीनगर अपघात घटनेला वाचा फोडण्याचं काम केलं. या मतदार संघात शिवसेनेची ताकद असून पक्षानं सुषमा अंधारे यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या निवडणुकीत संधी दिल्यास सुषमा अंधारे प्रचंड मतांनी निवडून येतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. पंतप्रधानांनी मागितली माफी पण फडणवीसांनी का नाही?; सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांचा आक्षेप; सुरक्षेतही काय चाललंय राजकारण? वाचा स्पेशल रिपोर्ट - objection on Z Plus security
  3. पंतप्रधान मोदी यांनी फक्त 'राजकीय माफी' मागितली, मनापासून नाही - संजय राऊत - Sanjay Raut on Modi

ABOUT THE AUTHOR

...view details