महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की नाही हो, चर्चेत 'आवाज थोडासा वाढला' एवढंच...; शंभूराज देसाई यांचा खुलासा - Shambhuraj Desai clarification

Shinde Group MLA Fight : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (1 मार्च) शेवटचा दिवस असून विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जातंय. तसंच हे दोन्ही नेते एकाच पक्षातील असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावरच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

shinde group mla Dada Bhuse and Mahendra Thorave fight in lobby of legislature Shambhuraj Desai clarification
भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की? शंभूराज देसाई यांनी केला खुलासा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 4:35 PM IST

भुसे-थोरवे यांच्यातील वादावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया

मुंबई Shinde Group MLA Fight : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (1 मार्च) पाचवा आणि शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावरच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भुसे-थोरवे यांच्यात कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला. तसंच दोघांमध्ये धक्काबुक्की झाली याचा पुरावा काय? असा सवालही शंभूराज देसाई यांनी केला.

विधिमंडळाच्या लॉबीत काय घडलं : विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या घटनेची माहिती देत शंभूराज देसाई म्हणाले, "दादा भुसे आणि महेंद्र थोरवे हे विकास कामावरून बोलत होते. यावेळी त्यांचा आवाज वाढला. पण त्यांच्यात हाणामारी किंवा धक्काबुक्की असं काहीच घडलं नाही. बोलताना केवळ आवाज वाढला म्हणजे वाद म्हणता येणार नाही. यावेळी मी हस्तक्षेप करत दोघांची समजूत काढली. त्यामुळं कोणताही वाद झाला नाही".

विकासकामांच्या निधीवरून झाला वाद? :एकीकडंशंभूराज देसाई यांनी भुसे-थोरवे यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडं विकासकामांच्या निधीवरून भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या लॉबीत आज मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विकास कामावरून बोलणं सुरू होतं. आमच्या मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य दिलं जात नाही, निधी दिला जात नाही, तसंच दुर्लक्ष केलं जातंय अशी व्यथा महेंद्र थोरवे यांनी भुसे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर संवादादरम्यान दोघांचाही आवाज वाढला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसंच यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली, असं सांगितलं जातंय. मात्र, असं असलं तरी विधिमंडळाच्या लॉबीत नेमकं काय घडलं होतं? हे दादा भुसे अथवा महेंद्र थोरवे यांच्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची एकजूट कुठेच दिसेना, महत्त्वाच्या प्रश्नांवरही विरोधक शांतच!
  2. पोलिसांच्या मदतीने डान्सबार सुरू, अनिल परब यांचा विधान परिषदेत दावा
  3. नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी तर मंडपासाठी १२ कोटी खर्च केल्याचा पटोलेंचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details