महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, उदयनराजेंचा खोचक टोला

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी शक्तीप्रदर्शन टाळत साधेपणाने गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Udayanraje Bhosale
शरद पवार आणि उदयनराजे भोसले (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

सातारा: नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या सोयीपसाठी जे इकडे तिकडे गेले असतील, त्यांना लोक माफ करणार नाहीत, असंही उदयनराजे म्हणाले.


दुष्काळी भागातीय योजना कोणाच्या काळात झाल्या : निवडणुकीच्या काळात कोणी इकडे तिकडे गेले असतील. परंतु, दुष्काळी भागात औद्योगिकरण, पाणी योजना कोणाच्या काळात झाल्या? असा सवाल करून खासदार उदयनराजे म्हणाले की, खंडाळा, माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागात पाणी पोहोचलं. त्यातून त्या भागाच्या विकासाला गती आली. त्यामुळं लोक कोणाला निवडून द्यायचं ते ठरवतील.

प्रतिकिया देताना उदयनराजे भोसले आणि डॉ. अतुल भोसले (ETV Bharat Reporter)



अतुल भोसलेंचा विजय निश्चित: उदयनराजे म्हणाले की, कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले हे मताधिक्क्याने निवडून येतील. कारण, त्यांचं कामच बोलतंय. त्यामुळं मी फार काही सांगायची गरज नाही. महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी आहोरात्र काम करत आहेत. त्याची परिणती विजयात होईल.


पृथ्वीराज चव्हाणांकडून धडधडीत खोटा आरोप : आमचे सरकार आल्यानंतर बोगस टेंडरची चौकशी करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाणांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. अतुल भोसले यांनी शासन निर्णय आणि बांधकाम विभागाकडील पत्र माध्यमांसमोर सादर केलं. विद्यमान आमदारांनी धडधडकीत खोटा आरोप केला आहे. कामाचे टेंडर प्रसिध्द झाले असून ट्रेझरीत ९ कोटी ६५ लाख रूपये देखील आले आहेत. माध्यमांशी याची शहानिशा करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचं आवाहन डॉ. भोसले यांनी केलं.

हेही वाचा -

  1. राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
  2. धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती
  3. राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करतो; संजय राऊत यांना तुम्ही फार मनावर घेऊ नका - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details