महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मतदान झाल्यानंतर जनताच महायुतीला गायब करेल; नाट्यमय घडामोडीनंतर सतेज पाटील बरसले - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

SATEJ PATIL
आमदार सतेज पाटील (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 4:18 PM IST

कोल्हापूर :छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे झालेला अपमान राज्यातील जनता विसरलेली नाही. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर महायुती राज्यातून गायब होईल. महायुतीच्या नेत्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर केलेल्या टीकेवर भाजपा खासदार धनंजय महाडिक बोलले का? असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर उत्तरच्या माघारीनंतर आज माध्यमांशी संवाद साधताना आमदार पाटील महायुतीवर बरसले.

"कोल्हापूर उत्तरच्या माघारी नाट्यावर पडदा टाकायचा निर्णय मी घेतलाय. जे घडलं त्यावर आता बोलण्याची काही आवश्यकता वाटत नाही. पुढे कसं जावं यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करणं आवश्यक आहे. इंडिया आघाडीचे सर्वजण एकत्र येत बैठक झालेली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील मदत करण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. पुढील दिशा आज संध्याकाळपर्यंत ठरेल". -सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील (ETV Bharat Reporter)

वंचितनं दिला पाठिंबा : कोल्हापुरातील शिरोळमध्ये वंचितनं माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर उत्तर मध्येही वंचित आमच्यासोबत राहील हे आम्हाला फायदेशीर आहे. चंदगडमध्ये आम्हाला थोडं यश आलं, मात्र जिथे शक्य आहे तिथं माघार घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील पंधरा दिवस मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. यामुळं मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही. आज मी पाठिंब्याविषयी शाहू महाराजांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.



उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन : महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राधानगरी भुदरगडचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आदमापूर येथे सभा घेत आहेत. तत्पूर्वी ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. उजळाईवाडी येथे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे मोर्चेबांधणी करणार आहेत. पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी चार्ज करणार असल्यानं आता कोल्हापूर जिल्ह्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

हेही वाचा -

  1. शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत, अजित पवारांबाबत म्हणाले, "बारामतीत.."
  2. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत
  3. चंद्रपूरमधील सहा मतदारसंघात काय स्थिती आहे? बंडखोरांचा महाविकास आघाडीला फटका बसणार?

ABOUT THE AUTHOR

...view details