मुंबई Sanjay Raut News: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलंय. ते म्हणाले, " पंतप्रधान मोदींनी सतत रडत राहू नये. भाजपावाले म्हणत आहेत की गरीब जनतेकडून मोदींना आशीर्वाद मिळत आहे. पण तुम्हाला या निवडणुकीत कळेल की, गरीब जनता ईव्हीएमला शिव्या देत आहे. ईव्हीएमला शिव्या देणं म्हणजे भाजपाला शिव्या देणं असं आहे."
मोदींची तुलना औरंगजेबाशी नाही : कालच्या आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे भाषण चांगल्या पद्धतीनं ऐकत आहेत. आमची राष्ट्रभक्तीची डिक्शनरी आहे. त्यांची स्वार्थाची डिक्शनरी आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब असं म्हटलं नाही. अथवा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबशी केली नाही. मी जे काल म्हटलं होतं, त्याचा चुकीचा विपर्यास काढला गेलाय. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मी कुठंही मोदींना औरंगजेब असं संबोधलं नाही. अथवा मोदींची तुलना औरंगजेबाशी केलेली नाही. संपूर्ण भाषण ऐका. त्यातील फक्त दोन-चार वाक्य उचलून आम्ही मोदींची तुलना औरंगजेबशी केली असा आरोप केला जात आहे. तो चुकीचा आहे."
जागा वाटपाचा तिढा सुटेल : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत संजय राऊत म्हणाले, "काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येऊन 'इंडिया' आघाडी झालीय. आम्ही त्यांना राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड इथं जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील जागा मागत आहे. भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजपाकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघंही भिंवडी जागेबाबत दावा करत आहे. मात्र या जागेवरीलही तिढा सुटेल."