नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भात 'मिशन 51' अंतर्गत काम करणार असल्याचे बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांची समन्वय बैठक नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात झाली. त्यात विदर्भात 'मिशन 51'चं लक्ष निर्धारित करण्यात आलं, अशी माहिती समोर आलीय.
'आरएसएस' देणार बळ : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. याचा फायदा विरोधक हे विधानसभा निवडणुकीत घेण्याची शक्यात आहे. त्यामुळं भाजपाला बळ देण्यासाठी 'आरएसएस' पावलं उचलण्यास सुरुवात केली. निवडणुकीत भाजपा आणि 'आरएसएस' हे विदर्भावर जास्त लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळंच गुरुवारी दोघांमध्ये नागपुरात बैठक पार पडली.
संघ व भाजपा रणनिती आखणार :काँग्रेसच्या खोट्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देण्यासाठी संघ व भाजपा रणनिती आखणार आहे. संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे. विधानसभा निवडणूकीत अतुल लिमये यांच्यावर संघ व भाजपामध्ये समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
विदर्भातील 51 जागेवर संघाचा फोकस :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या सामाजिक समरसता मंच, सामाजिक सद्भावना मंच, स्वदेशी जागरण मंच इत्यादी गतीवीघींच्या प्रमुख बैठकीत झाली आहे. यात विदर्भातील 11 जिल्ह्यातील संघ आणि भाजपाचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. विदर्भातील 62 पैकी 51 जागांवर संघाचा फोकस असणार आहे.
हेही वाचा
- हरियाणातील विजयाचा पॅटर्न भाजपा महाराष्ट्रात राबवणार; नेमकी रणनीती काय?
- मुख्यमंत्रिपदासाठीच ठाकरेंचं 'दार उघड, बये दार उघड', महायुतीच्या नेत्यांची टीका
- कागलच्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'; संजय मंडलिकांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, मुश्रीफांचं टेशन वाढलं