महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे..." राज ठाकरेंची सरकारवर खोचक टीका - Raj Thackeray on Mahayuti - RAJ THACKERAY ON MAHAYUTI

Raj Thackeray on Mahayuti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये बोलताना वरळीतून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच, उमेदवारही निश्चित झाल्याचे संकेत राज ठाकरे यांनी यावेळी दिले. 'माझी लाडकी बहीण योजने' बाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.

Raj Thackeray on Mahayuti
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 4:15 PM IST

सोलापूर Raj Thackeray on Mahayuti :मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. सोलापूर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत 'माझी लाडकी बहीण योजने'बाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. "लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणण्यापेक्षा लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे व्हाल." अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंची सरकारवर टीका (Source - ETV Bharat Reporter)

वरळीतून मनसे निवडणूक लढवणार :राज ठाकरे यांना, वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना त्यांनी वरळीतून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. "कोण कुठे कोणत्या मतदारसंघात उभा आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. आम्हाला ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत." असं राज ठाकरे म्हणाले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंचे पुतणे आहेत. ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते.

संदीप देशपांडेच्या नावाला अप्रत्यक्ष होकार : 2009 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यावेळी मनसेला वरळी मतदारसंघातून 36 ते 38 हजार मतं मिळाली होती. या वेळी मनसे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिलं जाण्याची चर्चा आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी होकारार्थी उत्तर देत विधानसभा निवडणुकीसाठी वरळीचा उमेदवारही निश्चित झाला असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे टक्कर देणार हे निश्चित मानलं जात आहे.

हेही वाचा :

  1. अनिल देशमुखांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग; भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, नेमका वाद काय ? - Anil Deshmukh Hoarding
  2. विधानसभेसाठी मनसेचे दोन शिलेदार जाहीर; बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे मैदानात - MNS Candidate List
  3. राज्य सरकारला दिलासा, 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने' विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Mumbai High Court
  4. अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details