मुंबई MNS Candidate List Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली. यात मनसे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election) मनसेनं दोन उमेदवारांची घोषणा केली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
प्रतिक्रिया देताना दिलीप धोत्रे आणि बाळा नांदगावकर (ETV BHARAT Reporter) राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेनं पत्रक प्रसिद्ध केलं.
शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर मैदानात : राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडं पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.
नांदगावकर यांचा राजकीय प्रवास : शिवसेनेत असताना बाळा नांदगावकर हे मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून नांदगावकर यांना ओळखलं जातं.
हेही वाचा -
- अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh
- वक्फ बोर्ड कायद्यातील दुरुस्तीच्या चर्चावर ओवैसी संतापून म्हणाले," "हे विधेयक धार्मिक..." - Bill To Amend Waqf Act
- उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस वादात आता सुप्रिया सुळेंची उडी, म्हणाल्या, "मला त्यांच्याकडून या अपेक्षा..." - Supriya Sule On Devendra Fadnavis