महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी", बाळासाहेब थोरातांचं खुलं आव्हान - Balasaheb Thorat on Vikhe Patil - BALASAHEB THORAT ON VIKHE PATIL

Balasaheb Thorat on Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधून माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवावी, असं आव्हान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.

Balasaheb Thorat on Vikhe Patil
बाळासाहेब थोरात (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 3:42 PM IST

Updated : Oct 2, 2024, 3:53 PM IST

अहमदनगर Balasaheb Thorat on Vikhe Patil :दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अपयश मिळाल्यानंतर सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल, असं ते म्हणाले आहेत. भाजपानं याला हिरवा कंदील दाखवल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे अशी लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.

बाळासाहेब थोरातांचं आव्हान :"सुजय विखे यांच्याऐवजी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी," असं खुलं आव्हान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत ठाम आहेत. "महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विधानसभा निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात लढण्याची तयारी आहे," असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीनं बैठका घेतल्या असून, विजयादशमीपर्यंत बैठका पूर्ण होतील असं सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार? : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडत विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार अशा चर्चा सुरू आहे. यावर बोलताना थोरातांनी राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट केलं. "काँग्रेस विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार या चर्चा कुठून येतायत माहीत नाही, मात्र अशा अफवा पसरवल्या जात आहेत," असं थोरातांनी सांगितलं.

जयश्री थोरात विधानसभेच्या रिंगणात? : बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात संगमनेर मधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू आहे. यावर थोरातांनी पुन्हा एकदा गुगली टाकत याबद्दल अजून काही ठरलेलं नाही, असं सांगितलं.

हेही वाचा

  1. फडणवीस साहेब तुमचे राजकीय गणित मीच बिघडवणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा - Jarange On Devendra Fadnavis
  2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना बजावले समन्स - Vinayak Savarkar Defamation Case
  3. "उद्धव ठाकरेंच्या रॅलीत हिरवे झेंडे..." देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल - Maharashtra Assembly Election 2024
Last Updated : Oct 2, 2024, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details