मुंबई : सध्या लाडक्या बहिणींकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेला (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme) महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतील अर्ज दाखल करण्याची 15 ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. त्यामुळं लाडकी बहीण योजनची मुदतवाढ संपली असली तरी, या योजनेला अजूनही मुदतवाढ मिळणार का? याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडं अपुऱ्या कागदपत्रांऐवजी किंवा ज्यांचे बँकेत आधार लिंक झाले नाही, अशा महिलांनी अर्ज दाखल करुनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अशा महिलांनी खात्यात पटकन पैसे येण्यासाठी काय करावे? असा सवाल लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. जर तुम्ही अर्ज दाखल करुनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा.
खात्यात पैसे येण्यासाठी काय करावं? : काही महिलांनी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. याला कारण म्हणजे ज्या बँकेत त्यांचं खातं आहे, त्या बँकेत त्यांचं आधार लिंक नाही किंवा अपुरी कागदपत्रं तसंच अन्य कारणामुळं त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पण अशा महिलांनी नाराज न होता जर त्यांनी ऑक्टोबरपूर्वी अर्ज दाखल केले असतील पण त्यांना पैसे आले नाहीत. अशा महिलांनी थेट पोस्टात डीबीटीच्या माध्यमातून खातं उघडावं. येथे साधारण अडीचशे ते तीनशे रुपये खातं उघडण्यास खर्च येतो. विशेष म्हणजे हे खातं उघडण्यास आधार लिंक करूनच हे खाते उघडलं जातं. त्यामुळं जर तुम्ही यापूर्वी लाडक्या बहिणीचा अर्ज दाखल केला असेल, तर तुमच्या पोस्टाच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ शकतात, असं शासनाकडून सांगण्यात आलय.
मुदतवाढ मिळणार?: राज्यात 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दुसरीकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील सुरुवातीला जुलै, ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये एकत्र जमा झाले आहेत. त्यानंतर 29 सप्टेंबरला तिसऱ्या हप्ताचे पैसे जमा झाले. ज्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांचे साडेचार हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा झालेत. म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे जमा झालेत. असे एकूण साडेसात हजार रुपये शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत.