महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोठं नाट्य, ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत सुप्रिया सुळेंकडून प्रश्न उपस्थित - Supriya Sule

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदानानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. मतदानानंतर स्ट्राँगरुममधील ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ खासदार तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी एक्स मीडियावर पोस्ट केला. स्ट्राँगरुममधील कॅमेरा ४५ मिनिटे व्हिडिओ ब्लँक होता, असं त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.

Supriya Sule
Supriya Sule (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 3:33 PM IST

पुणे- बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पारं पडलं. निवडणुकीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशिन या स्ट्राँगरुममध्ये हलविण्यात आल्या आहेत. या ईव्हीएम मशिन 4 जूनपर्यंत म्हणजे मतदानाचा निकाल लागेपर्यंत सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ( NCP SP ) कार्यकर्त्याला स्ट्राँगरुमच्या निगराणीकरिता ठेवण्यात आलेले सीसीटीव्ही ४५ मिनिटे कार्यरत नसल्याचं आज सकाळी आढळून आले. काहीतरी संशयास्पद घडल्याचं लक्षात येताच कार्यकर्त्यानं त्वरित स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ईव्हीएम स्ट्राँगरुमच्या ४५ मिनिटे बंद पडलेल्या कॅमेऱ्याबाबत आक्रमक भूमिका घेतली.

प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर नाही-खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही सारखे उपकरणे बंद असणं अत्यंत संशयास्पद आहे. प्रशासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे." खासदार सुळे यांनी कॉम्प्युटच्या स्क्रीनवर सीसीटीव्ही बंद पडलेले दिसत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "हा प्रकार निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित यंत्रणेला आणि प्रशासनाला कळविल्यानंतर त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.

निवडणूक आयोगानं कारवाई करावी-खासदार सुळेंनी निवडणूक आयोगाचेही एक्स पोस्टमधून लक्ष वेधलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "दुसरं म्हणजे तिथे कोणताही टेक्निशियन उपलब्ध नव्हता. ईव्हीएमची काय स्थिती आहे, हे पाहण्याची निवडणूक प्रतिनिधींना परवानगी नव्हती. हे अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. या प्रकाराची भारतीय निवडणूक आयोगानं गांभीर्यानं दखल घ्यावी. सीसीटीव्ही का बंद होते, याचे कारण द्यावे. या प्रकारच्या त्रुटीसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणीदेखील खासदार सुळेंनी केली. अद्याप, ईव्हीएम स्ट्राँगरुमच्या बंद पडलेल्या सीसीटीव्हीबाबत सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

बारामती लोकसभा निवडणूकपवार घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी-मतदानाच्या शेवटच्या दिवशी मतदारांना धमकाविणं, मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटपं करणं असे प्रकार घडल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. बारामती लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कन्या तथा बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे रिंगणात आहेत.

हेही वाचा-

  1. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या वादाचा पवार कुटुंबावर परिणाम, बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय वाद झाला? - Baramati lok Sabha election 2024
  2. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, ५० वर्षानंतर पहिल्यांदाच बदलावी लागली 'ही' गोष्ट - Baramati lok Saba election 2024
  3. बारामतीत काट्याची टक्कर? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्या लढतीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabah Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details