महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; 'या' अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी - SP NCP CANDIDATE LIST 2024

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

SP NCP CANDIDATE LIST 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 3:37 PM IST

Updated : Oct 27, 2024, 5:25 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या यादीची घोषणा केलीय. 9 उमेदवारांची तिसरी यादी करण्यात आलीय. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 67 उमेदवारांची घोषणा केली होती. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवार जाहीर करण्यात आलीय.

अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी : समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) प्रवेश केला. त्यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सना मलिक यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. "फहाद अहमद हा सुशिक्षित तरुण आहे आणि त्यानं देशभरात एक कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. अशा नेत्यांना आपण संधी द्यावी अशी लोकांची इच्छा आहे. ते आधी समाजवादी पक्षात होते पण आम्ही 'सपा'शी चर्चा केली आणि त्यांना आमच्या पक्षात घेतलं. आता त्यांना आमच्या पक्षाकडून अणुशक्ती नगर मतदारसंघातून तिकीट दिलं," असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

  • करंजा - ज्ञायक पटणी
  • हिंगणघाट - अतुल वांदिले
  • हिंगणा - रमेश बंग
  • अणुशक्तीनगर - फहाद अहमद
  • चिंचवड - राहुल कलाटे
  • भोसरी - अजित गव्हाणे
  • माझलगाव - मोहन बाजीराव जगताप
  • परळी - राजेसाहेब देशमुख
  • मोहोळ - सिद्धी रमेश कदम

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून 11 महिलांना उमेदवारी

राज्य सरकारवर टीका : वांद्रे रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. "सरकारनं योग्य व्यवस्था केली नाही, त्यामुळं ही घटना घडली. अशा घटना वारंवार घडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. वांद्रे येथं घडलेल्या भयंकर घटनेचा आम्ही निषेध करतो." असं जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

हेही वाचा

  1. जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
  2. बडनेरात 'बंड'; दिवंगत आमदाराच्या पत्नी कडाडल्या, "मातोश्रीच्या सन्मानासाठी..."
  3. जागावाटपाचा घोळ असताना संजय राऊत झाले मवाळ; म्हणाले,"देवेंद्र फडणवीस यांच्याशी..."
Last Updated : Oct 27, 2024, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details