मुंबई Naseem Khan : काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. यादीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलाय. त्यासोबतच महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. तसंच काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांना पुन्हा एकदा स्टार प्रचाराच्या यादीत स्थान देण्यात आलाय. काँग्रेस पक्षाला नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय. आजपासून आपण निवडणूक प्रचारात सहभाग घेणार असल्याची माहिती नसीम खान यांनी दिलीय.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नसीम खान यांना पुन्हा स्थान, काय म्हणाले नसीम खान? - lok sabha election
Naseem Khan : काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. यात काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांना पुन्हा एकदा स्टार प्रचाराच्या यादीत स्थान देण्यात आलाय. काँग्रेस पक्षाला नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय.
Published : May 5, 2024, 4:06 PM IST
का नाराज होते नसीम खान : महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपात उमेदवारी दिली नसल्यानं काही नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते. ऐन लोकसभा निवडणूक काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय. नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळं आपणास वाईट वाटलं असून यापुढील प्रचारात आपण सहभागी होणार नसल्याच स्पष्ट इशारा दिला होता.त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस पक्षाचे भेट देखील घेतली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र प्रभारी रमेशचनीतला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि चंद्रकांत हंडोरे यांनी नसीम खान यांची समजूत काढल्याचं बोललं जातंय. त्यामुळं नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस पक्षाला यश आलं असून त्यांचच त्याचा प्रत्यय म्हणून काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकाच्या यादीत नसीम खान यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आलंय.
आज पासून प्रचारात सक्रिय :काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांच्यात सोबत ईटीव्ही भारतनं संपर्क साधला असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे मी माझी वैयक्तिक भावना नाही तर माझ्या समाजाची भावना व्यक्त केलीय. पक्षश्रेष्ठींनी आपली भावना समजून घेतली आहे. देशातील संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी लढा देत आहे, त्यांच्यासोबत देशातील जनता, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळं आजपासून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहोत. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अलिबागला प्रचारसभा होत असून आपण त्यात सहभागी होण्यासाठी निघालो असल्याचं नसीम खान यांनी म्हटलंय.
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची जाहीर केलेली यादी : या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, नसीम खान, अमित देशमुख, नितीन राऊत, वसंत पुरके, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, कुणाल पाटील, हुसेन दलवाई, रमेश बागवे, भाई जगताप, राजेश शर्मा, मुजाफर हुशेन, अभिजित वंजारी, रामहरी रुपणवार, अतुल लोंढे, सचिन सावंत, इब्राहिम शेख, सुनील अहिरे, वाजीत मिरझा अनंत गाडगीळ, संध्याताई सव्वालाखे यांचा समावेश आहे.
हेही वाचा :