महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

ETV Bharat / politics

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं; अदिती तटकरे म्हणाल्या, "सावत्र भावावर कारवाई..." - Missused of Ladki Bahin Yojana

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : एकीकडं हजारो महिला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा लाभ घेत असताना दुसरीकडं याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावर आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भाष्य केलंय.

Aditi Tatkare says govt will take action against those who take disadvantage of Ladki Bahin Yojana
अदिती तटकरे (ETV Bharat Reporter)

मुंबई Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, असं असतानाच मराठवाड्यातील नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्र चालक सचिन थोरात यानं घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.

"सचिन थोरात यानं गैरप्रकारे रोजगार हमी योजनेसाठी आलेल्या ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड, बँक खाते याचा वापरकरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. असं करुन त्यानं लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आले. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी सरकारनं खबरदारी घेतली आहे. अशा सावत्र भावावर कारवाई करण्यात येईल," अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.

तत्काळ कारवाई करण्यात येईल : सोमवारी (30 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अदिती तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "नांदेडमध्ये घोटाळा झाल्याची बाब रविवारी सायंकाळी आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. तसंच बँक मॅनेजरशी संपर्क साधून सचिन थोरातचे बँक खाते सील करण्यात यावे, असे निर्देश दिले. त्याचबरोबर इथून पुढं कुठल्याही शासकीय योजना असो किंवा अन्य व्यवहार या खात्यावर जमा होणार नाहीत. हे खाते बंद करण्यात यावे, असे निर्देश सरकारनं बँकेला दिलेत. याचबरोबर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. 37 अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्या सावत्र भावावर तत्काळ कारवाई करण्यात येईल", असंही त्यांनी सांगितलं.

  • 521 कोटी रुपये जमा : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झालीय. रविवारी 29 सप्टेंबर रोजी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपैकी 34 लाख 74 हजार 116 लाभार्थ्यांच्या खात्यात 521 कोटी रुपये जमा आहेत," अशी माहितीदेखील अदिती तटकरे यांनी दिलीय.

हेही वाचा -

  1. आनंदाची बातमी!,'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; कुणाला 4500 तर कुणाला 1500 रुपये - Ladki Bahin Yojana
  2. 'लाडकी बहीण योजने'वरुन राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "ही योजना बंद..." - Ladki Bahin Yojana
  3. "पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार कशी?", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - CM Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details