महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024

Vidhan Parishad Election 2024 : मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे आता विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नार्वेकर यांनी मंगळवारी विधानभवनात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तर ११ सदस्यांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीकरिता एकूण १४ उमेदवारांनी नामनिर्देशन केले आहे. त्यामुळं हे अर्ज कायम राहिल्यास विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Milind Narvekar
मिलिंद नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज केला दाखल (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 6:55 PM IST

Updated : Jul 2, 2024, 8:21 PM IST

मुंबई Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या अकरा जागांची निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांचा आता ट्विस्ट वाढला आहे. कारण ११ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं विधानपरिषद निवडणूक अटळ आहे. दरम्यान, आज शिवसेना (ठाकरे गटाकडून) मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं महाविकास आघाडीकडून ३ तर महायुतीकडून ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.



मतांचे गणित जुळवणे कठीण: मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं आता निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसंच मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीमुळं महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढलय. निवडणुकीत मते फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मतांचं समीकरण आणि मतांचं गणित जुळवणं दोन्हीसाठी कठीण होणार आहे. यामुळं या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.


पक्षाचे उमेदवार कोण? :
भाजपा
-पंकजा मुंडे
-अमित गोरखे
-योगेश टिळेकर
- सदाभाऊ खोत
-परिणय फुके



शिवसेना (ठाकरे गट)
-मिलिंद नार्वेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
-जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस
-प्रज्ञा सातव

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
-राजेश विटेकर
-शिवाजी गर्जे

शिवसेना (शिंदे गट)
-कृपाल तुमाने
-भावना गवळी

अपक्ष उमेदवार

- अरुण जगताप

-अजय सेंगर


राजकीय पक्षांना ताकद आजमावण्याची संधी: लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आपली ताकद आजमावून पाहण्याची आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची संधी या मतदानामुळं मिळणार आहे.

हेही वाचा -

  1. सभापतींचा निर्णय लोकशाही विरोधी : दावनेंच्या निलंबनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना - Uddhav Thackeray targeted Mahayuti
  2. सभागृहातील शिवीगाळ भोवली; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित - LOP Ambadas Danve Suspension
  3. शिवीगाळ प्रकरण तापलं; 'निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत...', प्रसाद लाड यांचा इशारा - Maharashtra Assembly Session 2024
Last Updated : Jul 2, 2024, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details