महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

" जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले - MAHAVIKAS AGHADI SEAT SHARING

महाविकास आघाडीत जागावाटपाकरिता आज मुंबईसह दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्याकरिता चर्चा होणार आहे.

Maharashtra Assembly election 2024
महाविकास आघाडीचे जागावाटप (source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 10:22 AM IST

Updated : Oct 21, 2024, 12:20 PM IST

मुंबई -भाजपानं रविवारी आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी घोषित करत जागावाटपात आघाडी घेतली आहे. मात्र, महायुतीविरोधात लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा गुंतागुंतीचा झाला. विशेष करून विदर्भातील काही जागांवर उद्धव ठाकरे पक्ष आग्रही आहे. जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे.


Live updates

  • महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्याकरिता काँग्रेसची दिल्लीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले माध्यमाशी बोलतना म्हणाले, " आम्ही आज रात्रीआमच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहोत. त्यानंतर उद्या यादी जाहीर करणार आहोत. आम्ही तिघेही उद्या पत्रकार परिषद घेणार आहोत. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये मतभेद आहेत. 30-40 जागांवरचा प्रश्न सोडवला जाईल."
  • महाराष्ट्राचे प्रभारी, रमेश चेन्निथला म्हणतात, "महाविकास आघाडीत) कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. जागांबाबत बोलणी सुरू असून त्यावर लवकरच तोडगा निघेल. आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे.


बैठकांचं सत्र जोरात, परंतु तिढा कायम?२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महिन्याभराचा अवधी उरलेला असताना अद्याप महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. रविवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत होणारी बैठकही जागावाटपाच्या तिढ्यामुळे रद्द झाली. अशात राज्यातील नेत्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे रविवारी मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन जागावाटपावर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल, यावर चर्चा केली. तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जवळपास दोन तास चर्चा केली. महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे.



सत्तेत येण्यासाठी मोठी संधीयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक ते दोन दिवसात अंतिम यादी जाहीर केली जाईल. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. तर याबाबत बोलताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख म्हणाले की, आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद नाही. जवळपास सर्वाधिक जागांवर एकमत झालं आहे. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची बैठक होणार होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.

  • महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या," सत्तेमध्ये येण्यासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता यासाठी धडपड करत आहे. जनता आमच्यासोबत असून जागा वाटपाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल."


विदर्भातील जागांवर तिढा-विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे. विदर्भातील आरमोरी, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, भंडारा, बल्लारपूर, चंद्रपूर, कामठी, रामटेक, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती - वरोरा या १२ जागांची उद्धव ठाकरे पक्षाकडून मागणी करण्यात आली. या जागांना काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विरोध आहे. याबाबत आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यातील काँग्रेस नेत्यांशी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईत महाविकास आघाडी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आजच पहिली यादीही घोषित होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हेही वाचा-

  1. महाविकास आघाडीत अंतर्गत आजार, एक्स-रे अन् एमआरआय काढावे लागतील, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य
  2. मोठ्या पक्षांच्या राजकारणात लहान पक्ष 'उपेक्षित', जागावाटपात दिलं जातंय दुय्यम स्थान
  3. "सर्व जागांवरील तिढा सुटला, २० ते २५ जागांचा निर्णय...", नाना पटोले यांची माहिती
Last Updated : Oct 21, 2024, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details